25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

चिंदर ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम यांचा कृषी दिनी डाॅ. निलेश राणे यांच्या हस्ते सत्कार.

- Advertisement -
- Advertisement -

सेवानिवृत्त विस्तार अधिकारी अकुंश मुणगेकर यांच्या तर्फे दिला जाणारा उपक्रमशील ग्रामविकास अधिकारी म्हणून मालवण तालुक्यात व्दितिय क्रमांक

चिंदर|विवेक परब : चिंदर ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम यांचा मालवण पंचायत समितीच्यावतीने कृषिदिनानिमित्त कृषी विभागाच्या विविध योजना उत्कृष्ट प्रकारे राबवील्या बद्दल माजी खासदार डाँ निलेशजी राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चिंदर येथे गेली पाच वर्षे ग्रामविकास अधिकारी म्हणून काम करणारे प्रकाश कदम मागील पाच वर्षांपासून चिंदर गावांमध्ये विविध उपक्रम राबवून चांगली सेवा देत आहेत . सन २०१६ यापासून बायोगॅसमध्ये उत्कृष्ट काम करून गावामध्ये पंचावन्न बायोगॅस बांधून पूर्ण केले आहेत. मागील पाच वर्षांमध्ये तालुक्यात सर्वाधिक बायोगॅस चिंदर गावामध्ये बांधण्यात आले आहेत तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून चिंदर गावामध्ये काजू लागवड, बांबू लागवड, गांडूळ युनिट, गोठा बांधणे इत्यादी कामे करून शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.
सन २०२१-२२ मध्ये कृषी विभागाच्या विविध योजना चांगल्या प्रकारे राबविल्यामुळे यावर्षी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्री अंकुश मुणगेकर यांच्या तर्फे दिला जाणारा उपक्रमशील ग्रामविकास अधिकारी म्हणून जाहीर केलेल्या पुरस्कारामध्ये चिंदर ग्रामविकास अधिकारी पी जी कदम यांनी दुसरा क्रमांक प्राप्त करून रक्कम रुपये तीन हजारांचे बक्षीस मिळविले आहे. या पुरस्कारासाठी गावांमध्ये राबविण्यात आलेल्या बायोगॅस, फळबाग लागवड, बांबू लागवड, गांडूळ युनिट, शेतकरी मासिक, वनराई व कच्चे बंधारे व कृषी विभागाच्या संलग्न योजनांचा विचार करण्यात आला. कार्यक्रमासाठी माननीय गटविकास अधिकारी, सभापती उपसभापती कृषी अधिकारी, पदाधिकारी हजर होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सेवानिवृत्त विस्तार अधिकारी अकुंश मुणगेकर यांच्या तर्फे दिला जाणारा उपक्रमशील ग्रामविकास अधिकारी म्हणून मालवण तालुक्यात व्दितिय क्रमांक

चिंदर|विवेक परब : चिंदर ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम यांचा मालवण पंचायत समितीच्यावतीने कृषिदिनानिमित्त कृषी विभागाच्या विविध योजना उत्कृष्ट प्रकारे राबवील्या बद्दल माजी खासदार डाँ निलेशजी राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चिंदर येथे गेली पाच वर्षे ग्रामविकास अधिकारी म्हणून काम करणारे प्रकाश कदम मागील पाच वर्षांपासून चिंदर गावांमध्ये विविध उपक्रम राबवून चांगली सेवा देत आहेत . सन २०१६ यापासून बायोगॅसमध्ये उत्कृष्ट काम करून गावामध्ये पंचावन्न बायोगॅस बांधून पूर्ण केले आहेत. मागील पाच वर्षांमध्ये तालुक्यात सर्वाधिक बायोगॅस चिंदर गावामध्ये बांधण्यात आले आहेत तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून चिंदर गावामध्ये काजू लागवड, बांबू लागवड, गांडूळ युनिट, गोठा बांधणे इत्यादी कामे करून शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.
सन २०२१-२२ मध्ये कृषी विभागाच्या विविध योजना चांगल्या प्रकारे राबविल्यामुळे यावर्षी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्री अंकुश मुणगेकर यांच्या तर्फे दिला जाणारा उपक्रमशील ग्रामविकास अधिकारी म्हणून जाहीर केलेल्या पुरस्कारामध्ये चिंदर ग्रामविकास अधिकारी पी जी कदम यांनी दुसरा क्रमांक प्राप्त करून रक्कम रुपये तीन हजारांचे बक्षीस मिळविले आहे. या पुरस्कारासाठी गावांमध्ये राबविण्यात आलेल्या बायोगॅस, फळबाग लागवड, बांबू लागवड, गांडूळ युनिट, शेतकरी मासिक, वनराई व कच्चे बंधारे व कृषी विभागाच्या संलग्न योजनांचा विचार करण्यात आला. कार्यक्रमासाठी माननीय गटविकास अधिकारी, सभापती उपसभापती कृषी अधिकारी, पदाधिकारी हजर होते.

error: Content is protected !!