मालवण | सुयोग पंडित : पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांच्या प्रमुखत्वाखाली कोकणातील जलपर्यटन व्यावसायिकांनी पर्यटन संचानालय मुख्य कार्यालय नरिमन पॉईंट मुंबई येथे पर्यटन संचालक श्री बि.एन.पाटील यांची भेट घेऊन कोंकणातील जलक्रीडा व्यावसायिकांच्या अनेक वर्षे प्रलंबित समस्या मांडण्यात आल्या त्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली .कोकण प्रांतला ७२१ की.मी सागरी किनारपट्टी लाभली असून या किनारपट्टीवर स्थानिक नागरिक जलपर्यटनाच्या व्यवसायाशी जोडले जाऊन देशविदेशातील पर्यटकांना चांगली सेवा दिल्याने राज्याच्या जलपर्यटन विकासात वाढ होत आहे.परंतु आपल्या पर्यटन संचानालय ची अनास्था व चुकीच्या नियम पद्धतीचा त्रास अधिकृत परवानगी घेतलेल्या व पर्यटन व्यावसायिक महासंघाशी संलग्न असलेल्या कोकणातील जलपर्यटन व्यावसायिकांना होत आहे .
जलपर्यटन क्षेत्रात सुसूत्रता यावी प्रशासन व जलपर्यटन व्यावसायिक यामध्ये समन्वय होणेसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघांच्या वतीने चर्चा होऊन श्री बि एन पाटील संचालक पर्यटन संचालनालाय यांनी महासंघाच्या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यानुसार राज्याच्या साहसीक्रीडा धोरणाच्या अंतर्गत जलपर्यटन व्यवसायाशी निगडित कोणताही बदल करताना जलपर्यटन व्यावसायिकांच्या सूचनेचा विचार करूनच निर्णय घेण्यात येणार आहे जलपर्यटनातील चुकीच्या पद्धतीने आकारणी केलेल्या क्रीडा प्रकारचे वार्षिक शुल्क कमी करून पुढील प्रमाणे राहणार आहे जेटस्की शुल्क २५००० रुपये कमी करून १२००० रुपये ,बनाना बोट १५००० रुपये कमी करून ७००० रुपये, बम्पर बोट १५००० रुपये कमी करून ७००० रुपये , स्पीड बोट ५०००० रुपये कमी करून १२०००, रुपये, नोकाविहार ५०००० रुपये कमी करून १२००० रुपये , सोफा बोट १५००० रुपये कमी करून ७००० रुपये , कायाकिंग १५००० रुपये कमी करून ७००० रुपये व नव्याने सुरु होणाऱ्या पॅरामोटरींग साठी १५००० रुपये शुल्कास पर्यटन संचालनालयाने मान्यता देण्यात आली आहे जलपर्यटनाचा समुद्रक्षेत्रात कालावधी हा १ सप्टेबर ते १० जून पर्यंत जलपर्यटनासाठी तलाव,धरण क्षेत्र ,नदी या क्षेत्रात बारमाही परवानगी असावी. जलपर्यटन व्यावसायिकांना समुद्र ,खाडी ,धरण,तलाव क्षेत्रात जलपर्यटन व्यवसायाची परवानगी घेताना राज्याच्या साहसीक्रीडा धोरणा प्रमाणे कार्यवाही व्हावी यासाठी संबंधित विभाग व पर्यटन संचालनालय यांच्यात सामंजस्य करार होणार आहे. जलपर्यटनातील प्रशिक्षणामध्ये एन आय डब्ल्यूएस ,वाय ए ,इसदा संस्थेचा समावेश होणार जलपर्यटन प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या नौकासाठी सर्वे व सर्वे प्रमाणपत्र मुदतीत मिळण्यासाठी पॉलिसी बनविली जाणार
राज्याच्या साहसीक्रीडा जलक्रीडा धोरणाच्या पॉलिसी मधील प्रत्येक कमिटी मध्ये जलपर्यटन व्यावसायिकांनी दिलेला प्रतिनिधी समाविष्ट होणार ,सागरी जल पर्यटन प्रलंबित परवाने तसेच परवाना नूतनीकरणासाठी पर्यटन हंगाम चालू होण्यासाठी जलपर्यटन सुधारित वेबसाईट पर्यटन संचालनालय बनविणार राज्याच्या साहसीक्रीडा धोरण मार्गदर्शक सूचना नियमावलीत जिल्हास्तरीय जलपर्यटन व्यवसायिकांशी चर्चा करून आवश्यक तो बदल होईल
जलपर्यटन परवानगीचे एक वर्ष परवानगीत वाढ करून तीन वर्षासाठी परवानगी दिली जाणार आहे पर्यटन महासंघाच्या माध्यमातून झालेल्या प्रयत्नाना यश मिळाले असून जलपर्यटन क्षेत्रात प्रशासन व व्यावसायिक यामध्ये समन्वय होऊन कोकण किनारपट्टी वरील जलपर्यटन वाढीस मदत होईल असा विश्वास श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी व्यक्त केला. यावेळी श्री रुपेश प्रभू, सिंधुदुर्ग जिल्हा जलक्रीडा संयोजक श्री प्रफुल्ल पेंडुरकर, रायगड जलक्रीडा संयोजक श्री उदय पाटील, रत्नागिरी जिल्हा जलक्रीडा संयोजक श्री चेतन निजाई, पालघर जिल्हा श्री प्रमोद पवार, मुंबई उपनगर जलक्रीडा संयोजक हे पर्यटन महासंघाचे पदाधिकारी उपस्थित राहून वरील विषयी झालेल्या चर्चासत्रात भाग घेतला. तसेच यावेळी श्री सहदेव बापर्डेकर, श्री मनोज खोबरेकर, श्री रामा चोपडेकर, सौ चारुशीला आचरेकर, श्री सचिन गोवेकर, श्री राजन कुमठेकर तसेच कोकण किनारपट्टीवरील जलपर्यटन व्यावसायिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.