भारतीय पुरुष संघ सुद्धा अंतिम फेरीत पाकिस्तानशी करणार दोन हात ; साखळी सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी.
ब्यूरो न्यूज | क्रीडा : भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने IBSA वर्ल्ड गेम्समध्ये चमकदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे सुरु असलेल्या या खेळांमध्ये प्रथमच टी ट्वेंटी क्रिकेटचा समावेश करण्यात आला, जिथे भारताच्या महिला संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ९ गडी राखून पराभव केला.
याशिवाय, भारतीय अंध पुरुष क्रिकेट संघाने IBSA जागतिक खेळांमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम फेरीत भारतीय अंध पुरुष क्रिकेट संघासमोर पाकिस्तानचे आव्हान असेल. आता भारतीय चाहत्यांना महिला संघानंतर पुरुष संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.
मात्र, याआधी IBSA वर्ल्ड गेम्सच्या साखळी सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाचा पराभव केला होता. अशाप्रकारे साखळी सामन्यात पाकिस्तानला हरवून जेतेपदाच्या लढतीत झालेल्या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
IBSA वर्ल्ड गेम्समध्ये प्रथमच क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. अशा प्रकारे भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. दुसरीकडे भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ९ षटकात ८ विकेट गमावत ११४ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना भारताने केवळ षटकात १ गडी बाद ४३ धावा केल्या, मात्र त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवावा लागला. मात्र, चांगल्या नेट रनरेटमुळे भारतीय संघाची विजेता म्हणून निवड करण्यात आली.