मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मालवण तालुक्यातील वडाचापाट पाटकरवाडी मंडळाच्या वतीने गेली ३० वर्ष श्री देवी शांतादुर्गा सभामंडप पाटकरवाडी येथे “देवीचा जागर ” मोठ्या उत्साहात नऊ दिवस साजरा केला जातो.
मालवण तालुक्यातील भाविक,भक्तगण मोठ्या श्रद्धेने वडाचापाट पाटकरवाडी येथिल मांडावर नवरात्री मध्ये देवीच्या दर्शनास येतात. या उत्सवाची सांगता आज १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी होणार आहे. यानिमित्त कोरोनाचे निर्बंध पाळून विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आज दुपारी महाप्रसाद आणि विसर्जन कार्यक्रम होणार आहे. देवीची मूर्ती प्रमोद व जगदीश पाटकर यांनी बनविली आहे.