27.2 C
Mālvan
Friday, April 11, 2025
IMG-20240531-WA0007

पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांच्या प्रमुखत्वाखाली पर्यटन महासंघाच्या शिष्टमंडळाने घेतली नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट.

- Advertisement -
- Advertisement -

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन वाढीसाठी काम करणाऱ्या पर्यटन व्यावसायिक महासंघाला व पर्यटन नियोजनाला पूर्ण सहकार्य करणार ; नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची ग्वाही.

मालवण | प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्त झालेले श्री किशोर तावडे यांची पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांच्या प्रमुखत्वाखाली पर्यटन महासंघाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. श्री किशोर तावडे यांची सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदावर झालेल्या नियुक्ती बद्दल त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी श्री किशोर दाभोळकर पर्यटन महासंघ सोशल मीडिया प्रमुख श्री कमलेश चव्हाण, पर्यटन महासंघ जिल्हा उपाध्यक्ष श्री मंगेश जावकर हे उपस्थित होते.

पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी महासंघ करीत असलेल्या कामाची माहिती देण्यात आली जिल्हापरिषदेच्या सहकार्याने जिल्हातील ४३१ ग्रामपंचायतीं मध्ये शाश्वत पर्यटन विकासासाठी ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपर्यटन समिती गठीत करणे चालू असून राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या पर्यटन योजना राबविण्याचे काम महासंघ करीत असून केंद्र सरकारच्या माध्यमातून शालेय विद्याथ्यांना पर्यटन क्षेत्रात आवड निर्माण होण्यासाठी युवा पर्यटन क्लब स्थापन करत असून यासाठी समन्वयक म्हणून पर्यटन महासंघा निवड झाली असून टुरिझम क्लब निर्मिती साठी महासंघ काम करत असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांना महासंघाच्या वतीने देण्यात आली तसेच जिल्ह्यात सागरी पर्यटन बरोबर ऍग्री कल्चर, फाॅरेस्ट , ऐतिहासिक स्थळे, साहसी क्रीडा, मेडिकल टुरिझम, कातळशिल्प क्षेत्रात पर्यटन व्यवसाय विस्ताराची गरज असून या क्षेत्रात आपल्या मदतीची आवश्यक्यता आहे असे मत श्री विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडले. त्यावर नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी पर्यटन वाढीसाठी नियोजन करण्यात येईल तसेच जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी काम करणाऱ्या पर्यटन व्यावसायिक महासंघास पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!