24.6 C
Mālvan
Saturday, November 23, 2024
IMG-20240531-WA0007

गवंडी समाजाच्या श्री व्यंकटेश्वर (बालाजी) मंदिर देवस्थानचा ब्रम्होत्सव यंदाही अभूतपुर्व उत्साहात संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

महेश इंगळे, बसलिंगप्पा खेडगींच्या हस्ते पालखी सोहळ्याचा झाला शुभारंभ .

मसुरे | प्रतिनिधी : श्री क्षेत्र अक्कलकोट येथील नामधारी क्षत्रिय गवंडी समाज अक्कलकोटच्या वतीने शहरातील बुधवार पेठ येथील गवंडी समाजाच्या श्री वेंकटेश्वर देवस्थानच्या ८२ व्या वर्धापन दिनानिमित्त श्रींचा उत्सव मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. गुरुवारी पहाटे ५ वाजता पारंपरिक पद्धतीने देवस्थानचे पुजारी पवन देसाई यांनी काकडआरती केली.

सकाळी ६ ते ७ या वेळेत पारंपरिक पद्धतीने श्रीना तुपाचे अभिषेक करण्यात आले. तदनंतर सकाळी ७ वाजल्यापासून दिवसभर दर्शनाकरीता भाविकांना मंदिर खुले करण्यात आले. उत्सवानिमित्त मराठवाड्यातील उस्मानाबाद येथून भजन व दिंडी मंडळांना आमंत्रित करण्यात आले होते. सकाळी १० वाजता श्रींची सजविलेल्या पालखीचे पूजन अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नगरसेवक बसलिंगप्पा खेडगी यांचे हस्ते संपन्न होऊन, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेशजी इंगळे यांचे हस्ते श्रींची आरती करून पालखी मिरवणुकीचे शुभारंभ करण्यात आले.

या पालखी मिरवणुकीत वाजंत्री, भजन, दिंडी इत्यादींचा सहभाग होता. पालखी मिरवणुकीचे प्रस्थान सकाळी १० वाजता बुधवार पेठ येथील मंदिरातून निघून कारंजा चौक, मौलाली गल्ली, आझाद गल्ली, डबरे गल्ली, देशमुख गल्ली, नवश्या मारुती मार्गे मेन रोड, फत्तेसिंह चौक, सेंट्रल चौक, कापड बाजार, कारंजा चौक, विजय चौक, बस स्टॅन्ड समोरून हसापुर रोड, खासबाग, हन्नूर चौक, बुधवार पेठ येथील मंदिरात दुपारी २ वाजता पालखीचे आगमन होऊन मंदिरास पालखी प्रदक्षिणा करून पालखी सोहळ्याचा सांगता समारंभ करण्यात आला. या पालखी सोहळ्यास शहरातील हजारो भाविक व समाज बांधव उपस्थित राहून श्रींच्या दर्शनाचा व सेवेचा लाभ घेतला.

तत्पूर्वी पालखी पूजनास व आरतीस उपस्थित असलेल्या महेश इंगळे, बसलिंगप्पा खेडगी आदि मान्यवरांचा सत्कार देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत गवंडी, व विश्वस्त सचिव अप्पाशा गवंडी, विश्वस्त श्रीशैल गवंडी, श्रीमंत चेंडके यांचे हस्ते करण्यात आला. दुपारी २ वाजता सर्व भाविकांना व सेवेकऱ्यांना देवस्थानच्या वतीने भोजन महाप्रसाद देण्यात आले. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी शशिकांत चेंडके, अक्कलकोट व्यंकटेश्वर देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत गवंडी, सचिव अप्पाशा गवंडी, विश्वस्त श्रीमंत चेंडके, श्रीशैल गवंडी, सुनील गवंडी, भीमाशंकर गवंडी, अशोक गवंडी, अमर शिरसाठ, सुनील गवंडी, वैजनाथ मूकडे, बळवंत गवंडी, निशांत निंबाळकर, संतोष शाली, प्रशांत दुधनीकर, रवि गवंडी, संजय गवंडी, दौलेश गवंडी, संदीप आमले, कुमार गवंडी, श्रीशैल राजापूरे, काशिनाथ राजापूरे, गोकुळ गवंडी, राहूल भंडारे, संतोष जमगे, सिद्धाराम अरबाळे, अविनाश क्षीरसागर, मनोज कामनूरकर, सागर गोंडाळ, देविदास गवंडी, संतोष माने, समर्थ जाधव, आदींसह सर्व समाजबांधव व भाविकभक्त उपस्थित होते.

या उत्सवातील सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली अमोल गवंडी, राकेश गवंडी, राहुल गवंडी, राजेंद्र गवंडी, सन्मुख गवंडी, हेमंत गवंडी, वेंकटेश गवंडी , गोकुळ गवंडी, यलप्पा गवंडी, संतोष जमगे, मल्लिनाथ गवंडी, नितीन पेठकर, डॉ.मल्लिनाथ गवंडी, वेंकट राजापुरे, श्रीशैल राजापुरे आदींसह इतर समाज बांधवांनी परिश्रम घेतले होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!