28.6 C
Mālvan
Sunday, April 13, 2025
IMG-20240531-WA0007

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव कालवश.

- Advertisement -
- Advertisement -

मुंबई | ब्युरो न्यूज : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्री सीमा देव यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. विविध चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवला होता. ‘आनंद’ या सिनेमात त्यांनी राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांच्या सोबत केलेली भूमिका स्मरणीय आहे. २०२० मध्ये त्यांना अल्झायमर या आजाराने ग्रासले. अभिनेते अजिंक्य देव यांनीच ट्वीट करुन ही माहिती दिली .

सीमा देव या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री होत्या. त्यांनी आतापर्यंत ८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केले काही काळानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांत काम करणे बंद करून केवळ मराठी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली होती. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला.

सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. पुढे त्यांचा विवाह अभिनेते रमेश देव यांच्याशी झाला. अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव ही त्यांची अपत्ये आहेत. २०१३ मध्ये रमेश देव आणि सीमा देव यांनी लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला होता. गेल्या वर्षी रमेश देव यांचे निधन झाले होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मुंबई | ब्युरो न्यूज : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतल्या सुप्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्री सीमा देव यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. विविध चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवला होता. 'आनंद' या सिनेमात त्यांनी राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांच्या सोबत केलेली भूमिका स्मरणीय आहे. २०२० मध्ये त्यांना अल्झायमर या आजाराने ग्रासले. अभिनेते अजिंक्य देव यांनीच ट्वीट करुन ही माहिती दिली .

सीमा देव या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री होत्या. त्यांनी आतापर्यंत ८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केले काही काळानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांत काम करणे बंद करून केवळ मराठी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली होती. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला.

सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. पुढे त्यांचा विवाह अभिनेते रमेश देव यांच्याशी झाला. अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव ही त्यांची अपत्ये आहेत. २०१३ मध्ये रमेश देव आणि सीमा देव यांनी लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला होता. गेल्या वर्षी रमेश देव यांचे निधन झाले होते.

error: Content is protected !!