27.4 C
Mālvan
Saturday, April 5, 2025
IMG-20240531-WA0007

पत्रकारांचे जिवनमान खर्‍या अर्थाने, जर्नालिस्ट युनियन उंचावणार : अध्यक्ष पांचाळ.

- Advertisement -
- Advertisement -

विद्यार्थी व समाजसेवकांचा तळेरे येथे सत्कार.

कणकवली /प्रतिनिधी.गणेश चव्हाण, श्रावण.पत्रकार, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्याने समाजाला त्याच्याकडुन समाज सुधारणार्‍या अनेक अपेक्षा आहेत. अशा निर्भिड पत्रकाराने परखडपणे पत्रकारिता केली तरच लोकशाही जिवंत राहू शकेल. व समाजाचा विकास होईल. आज प्रामाणिक काम करणारा पत्रकार हा दुर्लक्षितच आहे. अशा पत्रकारांचे जिवनमान खर्‍या अर्थाने उंचावण्यासाठी व न्याय, अधिकार मिळवून देण्यासाठी इंडीयन जर्नालिष्ट युनियन पाठीशी राहील. असे प्रतिपादन महाराष्ट्रचे अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी तळेरे येथील आयोजित पत्रकार गुणगौरव समारंभात केले. इंडियन जर्नालिस्ट युनियन पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी कार्य करणाऱ्या राष्ट्रिय संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांच्या दहावी, बारावी, पदवी तसेच शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण झालेले व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. तसेच अन्य गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व शैक्षणीक साहित्य देऊन आणि पत्रकारांना प्रमाणपत्र देऊन १९ ऑगस्ट रोजी तळेरे येथील श्रावणी कॉम्प्युटरच्या प्रज्ञांगणमध्ये गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना इंडियन जर्नालिष्ट युनियन चे सचिव व महाराष्ट्रचे अध्यक्ष नारायण पांचाळ पुढे म्हणाले की, एकत्र येऊन सांघिक काम केल्यावरच पत्रकारांच्या हिताचे काम होऊ शकेल. त्यासाठी जागरूकता आपण केली पाहिजे. आपली एकजूट ही शासनाला दिसली पाहिजे, अन्यथा पत्रकार दुर्लक्षितच राहील. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचे पत्रकारितेत योगदान अनमोल आहे. त्यांच्या नावाने पत्रकारिता विद्यापीठ सुरू करावे आणि त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारीतेतील योगदाना बद्दल त्यांना केंद्र शासनाने भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार द्यावा, अशी मागणी शासणाकडे केली असल्याची माहिती पांचाळ यांनी दिली.

यावेळी युनियनचे सिंधुदुर्ग प्रमुख सतीश साटम, पाचल हायस्कूलचे कलाशिक्षक सिद्धार्थ जाधव, रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार नरेश पाचलकर, तळेरे येथील दळवी काॅलेजचे प्रा. प्रशांत हटकर यांच्यासह पालकांमधून जाकिर शेख, नितीन पाटील, श्री. ब्रम्हदंडे, राजेश जाधव, नवलराज काळे यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार उदय दुधवडकर, गणेश चव्हाण, संजय खानविलकर, दत्तात्रय मारकंड, निकेत पावसकर, विवेक उर्फ राजू परब, उमेद फाउंडेशनचे नितीन पाटील व श्रावणी कॉम्प्युटरचे संचालक श्रावणी मदभावे, व सर्व पत्रकार बंधु उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय मारकड व सुत्र संचालन सतीष मदभावे यांनी केले तर आभार उदय दुधवडकर यांनी मानले.फोठो पुढेहे

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!