कणकवली /सहिष्णू पंडित: रविवार. दि. 20 रोजी कणकवली येथील राष्ट्र सेविका समितीने ऐलमा पैलमा अक्षरदेवा सिंधुदुर्ग महिला साहित्य समूहातील कथालेखिकांना कथा अभिवाचनासाठी निमंत्रित केले.अशा पद्धतीचा ऐलमा पैलमा समूहाचा हा पहिलाच जहीर कार्यक्रम होता.यात वृंदा कांबळी, अपर्णा प्रभु परांजपे,डॉ. मेधा फणसळकर, स्नेहल फणसळकर, स्मिता नाईक, अनुराधा दीक्षित ,उत्तरा जोशी या लेखिका सहभागी होत्या.श्रोत्याकडून त्यांना उत्स्फूर्त दाद मिळाली.या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्र सेविका समितीच्या सेविका मृणाल ठाकूर,संपदा प्रभुदेसाई आणि अन्य सेविकांनी केले होते.राष्ट्र सेविका समितीच्या या उल्लेखनीय निमंत्रणाबद्दल ऐलमा पैलमाच्या वतीने वैशाली पंडित यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -