मालवण तहसीलदारांना दिले निवेदन.
मालवण | वैभव माणगांवकर : मौजे तोंडवळी तळाशिलच्या समुद्रकिनारी समुद्राच्या तडाख्यामुळे होणारी धूप रोखण्यासाठी वेळोवेळी शासन दरबारी निवेदने पाठवुनही त्याची दखल न घेतल्याने तळाशील ग्रामस्थ, १५ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १०वाजल्यापासून बेमुदत उपोषण करणार आहेत ,तसे निवेदन तळाशिल ग्रामस्थांच्या वतीने तळाशिल ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री. जयहरी कोचरेकर यांनी दिले आहे .
हे बेमुदत उपोषण तळाशील समुद्रकिनारी धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम तत्काळ सुरू करणे आणि कालावल खाडीतील तळाशिल – रेवंडी समोरील वाळू उपसा बंद करणे अशा दोन प्रमुख मागण्यांसाठी केले जाणार आहे . हे बेमुदत उपोषण जोपर्यंत प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होत नाही तसेच संबंधीत सक्षम अधिकाऱ्यांकडून त्याबाबतचे लेखी पत्र मिळेपर्यंत बेमुदत सुरू राहील असेही मालवण तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रसंगी संजय केळुस्कर, आनंद खडपकर, ताता टीकम, मुन्ना तांडेल, संजय जुवाटकर, प्रकाश बापार्डेकर, विवेक रेवंडकर, पुंडलिक जुवाटकर, अनिरुद्ध जुवाटकर आणि विजय रेवंडकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.