29.3 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

समाजातील चांगल्या उपक्रम व व्यक्तिंना सक्रीय पाठिंबा देणे ही खरी सामाजिक गरज : माजी नगरसेवक मंदार केणी.

- Advertisement -
- Advertisement -

मालवणात वायरी येथील श्री देवी केळबाई मंदिर सभागृहात ‘मातृत्व आधार फाऊंडेशन’ संस्थेचा चौथा वर्धापनदिन सोहळा उत्साहाने संपन्न.

गरजूंपर्यंत पोहोचून सामाजिक सेवा व्रत घेऊन जोमाने चालूच राहणार असा मातृत्व आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष लुडबे यांचा संकल्प.

मालवण | सहिष्णू पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या ‘मातृत्व आधार फाऊंडेशन’ संस्थेचा चौथा वर्धापनदिन सोहळा आज स्वातंत्र्य दिनी उत्साहाने संपन्न झाला. ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ अशी धारणा ठेवून वाटचाल करत सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक, निराधारांना आधार देणारी संस्था अशी ओळख असलेल्या या संस्थेच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार व दै तरुण भारतचे मुख्य संपादक श्री शेखर सामंत यांची उपस्थिती होती. या सोहळ्याच्या सुरवातीला सूत्रसंचालक प्रभूदास आजगांवकर यांनी उपस्थित मान्यवरांना मंचावर निमंत्रित केले . त्या नंतर ज्येष्ठ नागरीक आजगांवकर आज्जी यांच्या व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कु. दिक्षा संतोष लुडबे हिने सुरेल स्वरांत ईशस्तवन सादर करून गणेश वंदना दिली.

आजगांवकर आज्जी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन (सोबत संस्थापक अध्यक्ष श्री संतोष लुडबे)

मुख्य सोहळ्याला सुरवात करताना मातृत्व आधार फाऊंडेशनचे सक्रीय सभासद व ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई यांनी त्यांच्या प्रास्ताविकात संस्थेच्या उद्देशपूर्ती व आगामी उद्देशांचा आढावा घेतला तसेच सामाजिक जाणिवेतून एकत्र येणार्या व फाऊंडेशन मार्फत मदत करणार् सर्वांविषयी विशेष कृतज्ञता व्यक्त केली. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सिंधुदुर्ग जनशिक्षण संस्थेचे विलास हडकर यांनी त्यांच्या मनोगतात उपस्थित युवक, युवती व बालकांना मोबाईल, तंत्रज्ञान यांचा मोजका वापर करावा आणि प्रत्यक्षात एकमेकांशी थेट संपर्कात राहून सहकाराने समाज घडवावा असा संदेश दिला. प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित असलेले माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी समाजाची आरोग्य विषयक परवड होऊ नये म्हणून कार्यरत रहावे असे सांगताना लोकप्रतिनिधी म्हणून जास्तीत जास्त समाजासाठी काम करत रहायची ग्वाही दिली. मंदार केणी यांनी त्यांच्या मनोगतात मातृत्व आधार फाऊंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे यांनी वैयक्तिक जीवनात पाॅलिटेक्निकच्या गरजूंना कशी अथक ४ वर्षे दत्तक घेऊन मदत केली याचाही सामाजिक व शैक्षणिक दाखला दिला. मान्यवर व ज्येष्ठ काँग्रेस नेते साईनाथ चव्हाण यांनी अवघ्या ४ वर्षात मिळालेल्या फाऊंडेशनच्या यशाची प्रशंसा केली व आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मातृत्व आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष लुडबे यांनी फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली व फाऊंडेशनचा प्रवास थोडक्यात कथन केला. आगामी काळात जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत आपण पोहोचू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सामान्य, आदिवासी व शोषित पिडितांसाठी फाऊंडेशनच्या मार्फत अथक काम चालूच राहील असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शेखर सामंत यांनी मातृत्व आधार फाऊंडेशन संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनाला सभासदांना शुभेच्छा देत संस्थेच्या कामाची प्रशंसा केली. ढोले बाबू सारख्या समाजासाठी झटणार्या व्यक्तीला मदतीची गरज लागली तेंव्हा मातृत्व आधार फाऊंडेशन संस्थेने पुढाकार घेतला ही गोष्ट खूप काही शिकवून जाते असे ते म्हणाले. आज समाजात काय चाललंय व समाजाला नेमकी कसली गरज आहे याची जाण असलेली सेवाभावी संस्था म्हणजे मातृत्व आधार फाऊंडेशन असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

या कार्यक्रमात आडवण येथील अंगणवाडी क्र. ९९ च्या विद्यार्थी वर्गाने व इतर लहान मुलांनी अनुक्रमे भारतमाता, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, शेतकरी, शिक्षिका, डाॅक्टर अशी वेशभूषा करून सादरीकरण केले. संस्थेचे सभासद जगदीश तोडणकर यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.

दरम्यान मालवण तालुका पत्रकार संघ अध्यक्ष संतोष गावडे यांचा विलास हडकर यांच्या हस्ते तर आपली सिंधुनगरी चॅनेलचे संपादक सुयोग पंडित यांचा अध्यक्ष शेखर सामंत यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई गोवेकर यांचा दादा वेंगुर्लेकर यांच्या हस्ते सत्कार.

शैक्षणिक क्षेत्रातील यशस्वी निमिषा परब, शाम मोतीलाल पटेल, लीशा जयवंत सावंत, ममता मेस्त्री श्रीकांत महादेव घोडगे, नतालीया अंतोन लुद्रीक, नृत्यांगना विश्लेषा योगेश मंडलिक , चंदना डिचवलकर, ऐश्वर्य मांजरेकर यांचा सत्कार संपन्न झाला. तसेच किशोर पवार , पंचक्रोशी क्रिकेट क्लबचे शाम वाक्कर यांना वायरी सरपंच भगवान लुडबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रील कलावंत बंटी कांबळी व सिद्धू चव्हाण यांचा सत्कार साईनाथ चव्हाण यांचाही गौरव करण्यात आला. कोकण आयडाॅल व माजी सैनिक राजन कुमठेकर यांचा सत्कार बाबा मोंडकर यांच्या हस्ते संपन्न झाला. रेवंडी येथील कुबल कुटुंब व वैष्णवी घाडीगांवकर यांनाही विशेष मदत करण्यात आली. आजच्या कार्यक्रमात मुख्य उद्देश असलेल्या समाज सेवक श्री. बाबू ढोले यांना नेत्र शस्त्रक्रियेसाठी एक लाख , एक हजार एकशे एक रूपये मदत देण्यात आली. मालवण किल्ला सर्व्हिस तर्फे मातृत्व आधार फाऊंडेशन संस्थेला रोख १०००० रूपये देणगी यावेळी दिली गेली.

अध्यक्ष श्री शेखर सामंत.

या सोहळ्याला मंचावर अध्यक्ष शेखर सामंत, पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे , विलास हडकर, विलास हडकर, साईनाथ चव्हाण, आजगांवकर आज्जी, दशरथ कवटकर, उद्योजक सागर वाडकर, माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी, सरपंच भगवान लुडबे, माजी नगरसेविका तृप्ती मयेकर , भाई गोवेकर, पर्यटन संघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर असे मान्यवर मंचावर उपस्थित होते. प्रभूदास आजगांवकर यांचे संस्कृत सुभाषितांसोबत बहारदार सूत्रसंचालन विशेष आकर्षण ठरले.

मंचावरील मान्यवर

संस्थापक अध्यक्ष संतोष लुडबे, सक्रीय विशेष सभासद दादा वेंगुर्लेकर , सुरेश बापार्डेकर, उमा लुडबे, श्री व सौ योगेश मंडलिक , भाई नेरकर, जगदीश तोडणकर, पत्रकार संदीप बोडवे व भूषण मेथर, लोकमान्य मल्टीपर्पज संस्थेचे नितीन मांजरेकर, स्मृती कांदळगांवकर, राष्ट्रवादी काॅन्ग्रेस अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सलीम ख़ान, उद्योजक रूपेश प्रभू , कोकण आयडाॅल व माजी सैनिक राजन कुमठेकर, सुधीर धुरी, नम्रता गांवकर, सरपंच भगवान लुडबे, साईनाथ चव्हाण, गणेश मोरजकर, रीज़वान शेख़, दीपक कुडाळकर, रोझरी इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका फिलोमीना पंडित, अभिनेत्री नमीता गांवकर , मालवण तसेच वायरी ग्रामस्थ, श्री देवी केळबाई मंदिर व्यवस्थापनाचे सदस्य, पुजारी श्री मयेकर व सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

मंदार केणी.( माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती)

अक्षय सातार्डेकर यांनी मंचावरील सर्व मान्यवरांचे , सहकार्य केलेल्या व्यक्तिंचे, फाऊंडेशनच्या सभासदांचे व उपस्थित सर्वांचे आभार मानले.

उपस्थित जनसमुदाय.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवणात वायरी येथील श्री देवी केळबाई मंदिर सभागृहात 'मातृत्व आधार फाऊंडेशन' संस्थेचा चौथा वर्धापनदिन सोहळा उत्साहाने संपन्न.

गरजूंपर्यंत पोहोचून सामाजिक सेवा व्रत घेऊन जोमाने चालूच राहणार असा मातृत्व आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष लुडबे यांचा संकल्प.

मालवण | सहिष्णू पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या 'मातृत्व आधार फाऊंडेशन' संस्थेचा चौथा वर्धापनदिन सोहळा आज स्वातंत्र्य दिनी उत्साहाने संपन्न झाला. 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' अशी धारणा ठेवून वाटचाल करत सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक, निराधारांना आधार देणारी संस्था अशी ओळख असलेल्या या संस्थेच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार व दै तरुण भारतचे मुख्य संपादक श्री शेखर सामंत यांची उपस्थिती होती. या सोहळ्याच्या सुरवातीला सूत्रसंचालक प्रभूदास आजगांवकर यांनी उपस्थित मान्यवरांना मंचावर निमंत्रित केले . त्या नंतर ज्येष्ठ नागरीक आजगांवकर आज्जी यांच्या व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कु. दिक्षा संतोष लुडबे हिने सुरेल स्वरांत ईशस्तवन सादर करून गणेश वंदना दिली.

आजगांवकर आज्जी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन (सोबत संस्थापक अध्यक्ष श्री संतोष लुडबे)

मुख्य सोहळ्याला सुरवात करताना मातृत्व आधार फाऊंडेशनचे सक्रीय सभासद व ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई यांनी त्यांच्या प्रास्ताविकात संस्थेच्या उद्देशपूर्ती व आगामी उद्देशांचा आढावा घेतला तसेच सामाजिक जाणिवेतून एकत्र येणार्या व फाऊंडेशन मार्फत मदत करणार् सर्वांविषयी विशेष कृतज्ञता व्यक्त केली. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सिंधुदुर्ग जनशिक्षण संस्थेचे विलास हडकर यांनी त्यांच्या मनोगतात उपस्थित युवक, युवती व बालकांना मोबाईल, तंत्रज्ञान यांचा मोजका वापर करावा आणि प्रत्यक्षात एकमेकांशी थेट संपर्कात राहून सहकाराने समाज घडवावा असा संदेश दिला. प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित असलेले माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी समाजाची आरोग्य विषयक परवड होऊ नये म्हणून कार्यरत रहावे असे सांगताना लोकप्रतिनिधी म्हणून जास्तीत जास्त समाजासाठी काम करत रहायची ग्वाही दिली. मंदार केणी यांनी त्यांच्या मनोगतात मातृत्व आधार फाऊंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे यांनी वैयक्तिक जीवनात पाॅलिटेक्निकच्या गरजूंना कशी अथक ४ वर्षे दत्तक घेऊन मदत केली याचाही सामाजिक व शैक्षणिक दाखला दिला. मान्यवर व ज्येष्ठ काँग्रेस नेते साईनाथ चव्हाण यांनी अवघ्या ४ वर्षात मिळालेल्या फाऊंडेशनच्या यशाची प्रशंसा केली व आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मातृत्व आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री संतोष लुडबे यांनी फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली व फाऊंडेशनचा प्रवास थोडक्यात कथन केला. आगामी काळात जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत आपण पोहोचू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सामान्य, आदिवासी व शोषित पिडितांसाठी फाऊंडेशनच्या मार्फत अथक काम चालूच राहील असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शेखर सामंत यांनी मातृत्व आधार फाऊंडेशन संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनाला सभासदांना शुभेच्छा देत संस्थेच्या कामाची प्रशंसा केली. ढोले बाबू सारख्या समाजासाठी झटणार्या व्यक्तीला मदतीची गरज लागली तेंव्हा मातृत्व आधार फाऊंडेशन संस्थेने पुढाकार घेतला ही गोष्ट खूप काही शिकवून जाते असे ते म्हणाले. आज समाजात काय चाललंय व समाजाला नेमकी कसली गरज आहे याची जाण असलेली सेवाभावी संस्था म्हणजे मातृत्व आधार फाऊंडेशन असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

या कार्यक्रमात आडवण येथील अंगणवाडी क्र. ९९ च्या विद्यार्थी वर्गाने व इतर लहान मुलांनी अनुक्रमे भारतमाता, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, शेतकरी, शिक्षिका, डाॅक्टर अशी वेशभूषा करून सादरीकरण केले. संस्थेचे सभासद जगदीश तोडणकर यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.

दरम्यान मालवण तालुका पत्रकार संघ अध्यक्ष संतोष गावडे यांचा विलास हडकर यांच्या हस्ते तर आपली सिंधुनगरी चॅनेलचे संपादक सुयोग पंडित यांचा अध्यक्ष शेखर सामंत यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई गोवेकर यांचा दादा वेंगुर्लेकर यांच्या हस्ते सत्कार.

शैक्षणिक क्षेत्रातील यशस्वी निमिषा परब, शाम मोतीलाल पटेल, लीशा जयवंत सावंत, ममता मेस्त्री श्रीकांत महादेव घोडगे, नतालीया अंतोन लुद्रीक, नृत्यांगना विश्लेषा योगेश मंडलिक , चंदना डिचवलकर, ऐश्वर्य मांजरेकर यांचा सत्कार संपन्न झाला. तसेच किशोर पवार , पंचक्रोशी क्रिकेट क्लबचे शाम वाक्कर यांना वायरी सरपंच भगवान लुडबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रील कलावंत बंटी कांबळी व सिद्धू चव्हाण यांचा सत्कार साईनाथ चव्हाण यांचाही गौरव करण्यात आला. कोकण आयडाॅल व माजी सैनिक राजन कुमठेकर यांचा सत्कार बाबा मोंडकर यांच्या हस्ते संपन्न झाला. रेवंडी येथील कुबल कुटुंब व वैष्णवी घाडीगांवकर यांनाही विशेष मदत करण्यात आली. आजच्या कार्यक्रमात मुख्य उद्देश असलेल्या समाज सेवक श्री. बाबू ढोले यांना नेत्र शस्त्रक्रियेसाठी एक लाख , एक हजार एकशे एक रूपये मदत देण्यात आली. मालवण किल्ला सर्व्हिस तर्फे मातृत्व आधार फाऊंडेशन संस्थेला रोख १०००० रूपये देणगी यावेळी दिली गेली.

अध्यक्ष श्री शेखर सामंत.

या सोहळ्याला मंचावर अध्यक्ष शेखर सामंत, पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे , विलास हडकर, विलास हडकर, साईनाथ चव्हाण, आजगांवकर आज्जी, दशरथ कवटकर, उद्योजक सागर वाडकर, माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी, सरपंच भगवान लुडबे, माजी नगरसेविका तृप्ती मयेकर , भाई गोवेकर, पर्यटन संघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर असे मान्यवर मंचावर उपस्थित होते. प्रभूदास आजगांवकर यांचे संस्कृत सुभाषितांसोबत बहारदार सूत्रसंचालन विशेष आकर्षण ठरले.

मंचावरील मान्यवर

संस्थापक अध्यक्ष संतोष लुडबे, सक्रीय विशेष सभासद दादा वेंगुर्लेकर , सुरेश बापार्डेकर, उमा लुडबे, श्री व सौ योगेश मंडलिक , भाई नेरकर, जगदीश तोडणकर, पत्रकार संदीप बोडवे व भूषण मेथर, लोकमान्य मल्टीपर्पज संस्थेचे नितीन मांजरेकर, स्मृती कांदळगांवकर, राष्ट्रवादी काॅन्ग्रेस अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सलीम ख़ान, उद्योजक रूपेश प्रभू , कोकण आयडाॅल व माजी सैनिक राजन कुमठेकर, सुधीर धुरी, नम्रता गांवकर, सरपंच भगवान लुडबे, साईनाथ चव्हाण, गणेश मोरजकर, रीज़वान शेख़, दीपक कुडाळकर, रोझरी इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका फिलोमीना पंडित, अभिनेत्री नमीता गांवकर , मालवण तसेच वायरी ग्रामस्थ, श्री देवी केळबाई मंदिर व्यवस्थापनाचे सदस्य, पुजारी श्री मयेकर व सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

मंदार केणी.( माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती)

अक्षय सातार्डेकर यांनी मंचावरील सर्व मान्यवरांचे , सहकार्य केलेल्या व्यक्तिंचे, फाऊंडेशनच्या सभासदांचे व उपस्थित सर्वांचे आभार मानले.

उपस्थित जनसमुदाय.

error: Content is protected !!