कोविड काळात भासणार्या ऑक्सिजनच्या कमतरतेसाठी महत्वाचे पाऊल…
ओरोस | प्रतिनिधी :आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोविड-19 साथीच्या रोगाशी उभ्दवलेल्या परिस्थितीत Oxygen Plant या क्षेत्रात मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता या क्षेत्रातील संसाधनामधील आवश्यक मनुष्यबळाचा तुटवडा दूर व्हावा याकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम प्रशिक्षण देण्याकरिता ऑक्सिजन प्लांट या क्षेत्रात जिल्ह्यातील 30 उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यांत येणार आहे. हे प्रशिक्षण जिल्हा सामान्य रुग्णालय सिंधुदुर्ग येथे होणार आहे.
उमेदवार आयटीआय मधून NTC (ITI) NAC Passed in fitter,Welder, MMTM, RAC, Electrcian, Instrument Mechanic, Aocp, MNCP, IMCP ट्रेडमधून पास असणे आवश्यक आहे. हे प्रशिक्षण 180 तासाचे असून 35 दिवस चालणार आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारानी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा अधिक माहिती साठी 9420740740,9403350689,02362-228835 या क्रमाकावर संपर्क साधावा. असे आवाहन शा. गि. पवार सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,सिंधुदुर्ग यांनी केले आहे.