कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या कोळंब ग्राम पर्यटन विकास समिती तर्फे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोळंब शाळा क्र. १ व ग्रामपंचायत कोळंब परिसर स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेमध्ये गावातील शाळा व ग्रामपंचायत परिसरातील, डासांची निर्मिती करणारी पाण्याने भरलेली डबकी, गाड्यांचे जुने टायर उचलणे, खड्डे बुजविणे, वाढलेला चारा छाटणी करणे अशी स्वच्छता करण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

या स्वच्छता मोहिमेमध्ये सरपंच सौ. सिया धुरी, अपूर्वा लोके, गणेश खडपकर, मंडळाचे अध्यक्ष संदीप शेलटकर, उपाध्यक्ष शैलेश प्रभू गांवकर, संदीप लाड, सचिव प्रमोद कांडरकर, खजिनदार प्रसाद भोजने, कार्यकर्ते सुनील फाटक, प्रवीण देसाई, श्रीकृष्ण धुरी, प्रियाल लोके, पंकज नेरकर, विशाल फणसेकर, चेतन भोजने, विठोबा ढोलम, राजू हडकर, जयेश फाटक, सुशांत भोजने, शरद लोके, आबा भोजने, निखिल नेमळेकर, सचिन पराडकर, कुणाल चोडणेकर, जयेश पराडकर, यश कोयंडे, तेजस आरोंदेकर, साहिल पराडकर, प्रसाद डिचोलकर, भूपेश ढोलम, नारकर, तुषार शेलटकर, यश शेलटकर, रिया शेलटकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
