मालवण | नझ़िरा शेख़ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये काल १० ऑगस्टला ‘रान भाज्यांचे प्रदर्शन’ हा उपक्रम संपन्न झाला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता सप्ताहा अंतर्गत ‘माझी माती माझा देश’ या संकल्पनेवर वर आधारित रानभाज्यांचे हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. आपल्या गांवाच्या आसपासच्या रानभाज्यांची ओळख व त्यांचे पौष्टिक महत्व याची माहिती यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनीं कडून देण्यात आली. त्यांना शिक्षक वृंदाचे मार्गदर्शन लाभले. या प्रदर्शनात विविध प्रकारच्या रानभाज्या यांचा समावेश करण्यात आला होता.

शाळेचे मुख्याध्यापक फादर ऑल्वीन गोन्साल्वीस, शिक्षक, पालक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.