कणकवली | गणेश चव्हाण : सध्याच्या ऑगस्ट २०२३ मध्ये पवित्र पोर्टल मधून होणाऱ्या शिक्षक भरती प्रक्रियेत कोरोनामुळे ज्या डी एड, बी एड असलेल्या उमेदवारांचे आई, वडिल किंवा पतीचे निधन झाले आहे व जे अलिकडील काळात वय वाढल्याने नोकरीसाठी अपात्र ठरणार आहेत अशा उमेदवारांना टी.ई.टी. परीक्षा पास होण्याची अट न घालता, ‘निराधार’ या निकषाखाली तत्काळ शिक्षक म्हणून नियुक्ती देऊन भरती प्रक्रियेत संधी देण्यात यावी अशी मागणी बहुजन शिक्षक, कर्मचारी महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विनायक हरकुळकर यांनी महाराष्ट्राचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या कडे निवेदना द्वारे केली आहे.
या मागणीचा केसरकर यांनी सकारात्मक विचार करून, या उमेदवारांना शिक्षक भरतीत समाविष्ट करून त्यांना व त्यांच्या निराधार कुटुंबाला आधार द्यावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विनायक हरकुळकर केली आहे.