आरोपीतर्फे ॲड. हरेश्वर ऊर्फ रोहीत गरगटे व ॲड. पूजा भोईटे यांचा युक्तिवाद..!
मालवण | वैभव माणगांवकर : मालवण तालुक्यातील मसुरे येथील त्रिवेणी फार्म हाऊसवर परेश सातार्डेकर (वय 38) हे सुपरवायझर म्हणून कामासाठी होते. फार्महाउस चे मालक सचिन सावंत हे मुंबईला गेले असता फार्महाउस वरील फुड प्रोसेसिंग मालाचे विक्रीतून आलेली रोख रक्कम ३०,००० व होंडा ऍक्टिवा गाडी चोरून नेल्या बाबतची तक्रार पोलीस स्थनाकात दाखल करण्यात आली होती. यातील संशयित आरोपी सुपरवायझर परेश सातार्डेकर यांना पोलिसांनी अटक केल्यावर त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज बुधवारी ही कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्यांची रु. १५ हजारच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली. आरोपीतर्फे ॲड. हरेश्वर ऊर्फ रोहीत गरगटे व ॲड. पूजा भोईटे यांनी काम पाहिले.