कणकवली | उमेश परब : वागदे ग्रामपंचायतची ग्रामसभा मंगळवारी सरपंच पूजा घाडीगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.ग्रामसभेत शासनाच्या निकषाप्रमाणे तंटामुक्ती ग्राम समितीच्या अध्यक्ष पदाची निवड करण्यात आली. तंटामुक्त अध्यक्षपदी सुरेंद्र कदम यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप घाडीगांवकर व नूतन तंटामुक्ती अध्यक्ष सुरेंद्र कदम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी उपसरपंच रूपेश आमडोसकर, ग्रामसेवक प्रशांत वर्दम,माजी तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप घाडीगावकर, ग्रा.प.सदस्य ललित घाडीगावकर, विना सरंगले,वैभवी कदम,संजना ताटे, रवींद्र गावडे, गणपत घाडीगावकर,संदीप सावंत, लक्ष्मण घाडीगावकर,विलास कदम, कैलास घाडीगावकर,अमित घाडीगावकर, संदीप घाडीगावकर,सुरेश घाडीगांवकर, गोविंद घाडीगांवकर, शिरीष घाडीगांवकर, विजय गावडे, पंढरीनाथ कदम,बाळा आर्डेकर,पिंट्या ताटे,शरद सरंगले प्रकाश कदम,महेश कदम आदी उपस्थित होते.