मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : शासकीय तंत्रनिकेतन, मालवण या संस्थेमध्ये संस्था स्तरावर शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी ( First Year & Direct 2nd Year Polytechnic) अभ्यासक्रमाच्या रिक्त असलेल्या जागांमध्ये प्रवेश घेण्याकरिता समुपदेशन प्रवेश फेरी घेण्यात येत आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेकरिता विहित कालावधीत ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलेले उमेदवार व जे उमेदवार नॉन कॅप करिता रजिस्ट्रेशन करणार / केले आहेत अशा प्रवेशित किंवा प्रवेश न मिळालेल्या सर्व उमेदवारांकरिता ही फेरी दि. १४ ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या फेरीसाठी इच्छुक उमेदवारांनी दि. १४ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०.०० ते १.०० या वेळेत संस्थेमध्ये सर्व मूळ प्रमाणपत्रे व प्रवेश फी सह प्रत्यक्ष उपस्थित राहून रजिस्ट्रेशन करणे अत्यावश्यक आहे. ज्यांनी अद्याप पर्यन्त अॅप्लीकेशन फॉर्म भरलेले नाहीत त्यांनी १४ ऑक्टोबर २०२१ रोजी दु. १.०० वाजेपर्यंत फॉर्म भरून FC सेंटरमधून कन्फर्म करायचे आहेत.या फेरीसाठी CAP मधून रजिस्ट्रेशन केलेले, NON CAP मधून रजिस्ट्रेशन केलेले तसेच ज्यांनी या अगोदर कोणत्याही पॉलिटेक्निक मध्ये प्रवेश घेतला आहे असे सर्व उमेदवार पात्र असतील. अधिक माहितीसाठी प्रा. गोलतकर ९७६४५१३१३३ किंवा प्राध्यापक योगेश महाडिक ९४२३६८२८४६ यांच्याशी संपर्क साधावा.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -