सहिष्णू पंडित | उप संपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य जागृती क्षेत्रातील क्रियाशील व्यक्ती व पर्यावरण विषयक तळमळ असलेले श्री राकेश परब यांना नुकताच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग विभाग यांचा ‘पर्यावरण मित्र’ हा सन्मानाचा पुरस्कार प्राप्त झाला. जवळपास अडीच दशके सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची सर्वच क्षेत्रातून नेहमी प्रशंसा होत असते. आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे बांदा प्रतिनिधी तसेच आपली सिंधुनगरी चॅनेल समूहाचे ते स्थापनेपासूनचे महत्वपूर्ण व्यक्ती घटक आहेत.
कुडाळच्या मराठा हाॅल येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर कुडाळ तालुका गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर, परब मराठा समाजाचे श्री. विनायक परब, पर्यावरण तज्ञ डाॅ. श्री. बापू भोगटे, बापू परब, जाॅयल डिसिल्वा असे मान्यवर उपस्थित होते.