पोलिसांत आकस्मित मृत्यूची झाली नोंद ; पुढील तपास सुरु…
मालवण | वैभव माणगांवकर : मालवण तालुक्यातील गोळवण येथील जयश्री बाळकृष्ण खरात (वय २७) या विवाहितेचा मृतदेह मंगळवारी दुपारी तिच्या राहत्या घरी गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. सदर घटनेबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास मालवण पोलीस करत आहेत.
मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयश्री यांचा विवाह पाच वर्षांपूर्वी बाळकृष्ण खरात यांच्याशी झाला. ते दोघेच घरात राहत होते.मंगळवारी बाळकृष्ण हे मालवण येथे कामास आले होते. दुपारी घरी परतल्यावर पत्नीचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. घरात पाहिले असता गळफास लावलेल्या स्थितीत जयश्री यांचा मृतदेह दिसून आला. पोलिस निरीक्षक एस एस ओटवणेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, रुक्मांगद मुंडे आदी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. जयश्री यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात होते. अधिक तपास पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण पोलीस करत आहेत.