शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले,नगरसेवक कन्हैया यांचा आरोप;शिवसेना शिष्टमंडळाने घेतली जिल्हापरिषद उपअभियंता श्री.सुतार यांची भेट…
कणकवली | उमेश परब : कणकवली पंचायत समितीच्या नवीन इमारती समोर फ्लेवर ब्लॉक व कुंपण बांधकाम पूर्ण झालेले आहे.या ठिकाणी ९ लाख १२ हजार रुपयांची निविदा काम झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आली आहे.यासंदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता श्री. सुतार यांची भेट घेतली.या भेटीत झालेल्या कामाची नंतर निविदा कशी प्रसिद्ध झाली?याबद्दल जाब विचारला. त्यावर हे काम सभापती मनोज रावराणे यांनी ॲडव्हान्स केलेले आहे. त्यामुळे ही निविदा प्रसिद्ध केल्याचे सांगितले. त्यावेळी संतप्त शैलेश भोगले, कन्हैया पारकर यांनी ही निविदा प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी केली. या संदर्भात पालक मंत्री उदय सामंत व वरिष्ठ स्तरावरुन चौकशी करण्यात येणार असल्याची सांगितले.
शिवसेना शिष्टमंडळाने जिल्हा परिषद बांधकाम व अभियंता श्री सुतार यांची भेट घेतली. यावेळी उपतालुका प्रमुख भालचंद्र दळवी, ऍड.हर्षद गावडे,अरुण राणे आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सदर भेटीनंतर फ्लेवर ब्लॉक व कुंपण काम झालेल्या ठिकाणी जात पाहणी केली.त्यावेळी श्री.सुतार यांनी झालेल्या कामाच्या ठिकाणी माहिती दिली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घाईगडबडीत काम करण्याची गरज काय? इमारत झाली होती ना मग हे काम झाल्यानंतर निविदा का? शेवटच्या टाइमिंगला भ्रष्ट्राचार करण्यासाठीच हे काम केला असल्याचा आरोप नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केला.९ लाखाची निविदा काढून सभापती भ्रष्टाचार करू पाहत असल्याचाही आरोप शैलेश भोगले यांनी केला.