मालवण | सुयोग पंडित : सध्याच्या महाराष्ट्र राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी एक छोटेखानी पत्रकार परिषद घेतली. ह्या पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेले अडिच ते तीन वर्षे महाराष्ट्र राज्यातील तडजोडीच्या राजकीय समिकरणांवर थोडक्यात परंतु थेट टीका केली. सध्याचे काही पक्ष हे निवडणूक संपल्यावर मतदारांशी देणे घेणे न ठेवता घाणेरडे राजकारण करत आहेत व आता मतदारांना ते लक्षात येऊ लागले आहे अशीही टीका मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी जोडली.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जर अजित पवार यांच्या सोबत गेलेत तर त्याची कल्पना शरद पवार साहेबांना नसेल ही गोष्ट न पटणारी असल्याचे सांगताना मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी भविष्यात सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आश्चर्य वाटणार नाही असा टोला लगावला. ह्या सर्व गोष्टींवर आपण महाराष्ट्र राज्यातील सर्वांपर्यंत पोहोचणार आहोतच आणि आगामी मेळाव्यात आपले दृष्टीकोन मराठी माणसांसमोर आपण सविस्तर पणे मांडू असे प्रतिपादन मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी केले आहे .