29.3 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

रबरी चेंडूचा ॠतूराज…हनू मालवणकर..!

- Advertisement -
- Advertisement -

गडग्यावरुन क्रिकेट :भाग १

सुयोग पंडित | क्रिडा विशेष : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या बोर्डिंग ग्राऊंडवर अनेक प्रथमश्रेणी लेदर बाॅल क्रिकेट सामने खेळवले जातात. या मैदानाला टेनीस व लेदर बाॅल क्रिकेटचा दैदिप्यमान वारसा आहे. गेल्या वीस वर्षात तयार केलेली टर्फ खेळपट्टी आणि प्रयत्न पूर्वक कष्टाने जपले गेलेले हिरवे आऊटफिल्ड या सोयी निर्माण होण्यापूर्वीही मालवण शहरातून उत्तमोत्तम लेदर व टेनीस बाॅल खेळाडू निर्माण केले आहेत. त्या वेळी लाल खडी म्हणजे सकेरा आणि एखादी मोठी लेदर बाॅल स्पर्धा असली तर मैदानावर धूळ माती टाकून त्यावर मैदानभर रोलींग करुन स्पर्धा खेळवणे असे अपार कष्टही निव्वळ क्रिकेटच्या जोपासनेसाठी केलेला क्रिकेट प्रेमी ज्येष्ठ व युवकांचा क्लब आजही मालवणात कार्यरत आहे. लेदर बाॅल व टेनीस क्रिकेट हे संपूर्ण कोरड्या वातावरणात शक्य असतात. पावसाळ्यात याच मैदानावर ‘लाल बाॅल’ किंवा रबरी चेंडूंच्या क्रिकेटची एक वेगळीच मजा अनुभवायला येते. आजपासून ३० वर्षांपूर्वी ती मजा थोडी जास्त ‘संख्येने’ खेळून व पाहून अनुभवली जात होती त्याला कारण या पावसाळी ॠतू मधला एक ‘ॠतूराज’ त्याच्या टोलेजंग फटकेबाजीने अवघ्या मालवणातील लहान मोठा क्रिकेट प्रेमी त्याचा खेळ पहायला मैदानाकडे छत्री सावरत किंवा भिजत देखील उभा रहायचा…अगदी बोर्डिंग ग्राऊंडच्या गडग्यावरुन, विहीरीकरडून, दादा बिडयेंच्या घरासमोरच्या झाडाच्या आसर्याला उभे राहून, टेक्निकल बिल्डिंगच्या व्हरांड्यात किंवा जागा मिळेल तिथून त्या ॠतूराजाची ‘पावसाळी फटकेबाजी’ अनुभवणे हा एक अवर्णनीय आनंद होता. रबरी चेंडूच्या त्या ॠतूराजाचे नांव होते हनू मालवणकर. मालवण शहरातील सुप्रसिद्ध अशा अ.शि.दे. टोपीवाला हायस्कूलच्या ‘अ’ व ‘ब’ तुकड्यांमध्ये शिकत मोठा झालेला एक हुशार विद्यार्थी अशी सुद्धा त्याची एक ओळख आहे हे खूप कमी जण जाणत असतील. भूमिती, भौतिक शास्त्र व चित्रकला विषयांत तो अचाट होता …म्हणजेच त्याला ‘डायमेन्शनस्’ व ‘वस्तुमान,आकारमान,घनता,घर्षण’ याची जन्मजात जाण होती. म्हणूनच तर लाल रबर बाॅल ओला झाल्या नंतर तो कसा टाईम करावा, चेंडूच्या लाईन लेंन्थ प्रमाणे तो कुठल्या दिशेला टोलवावा आणि त्याच्या उसळणार्या तत्वाला थेट टोलेजंग कसे धाडावे हे हनू मालवणकर करु शकत होता.

त्यावेळी पावसाळ्यातील बोर्डिंग ग्राऊंड हे कांगा लीगची किंवा काऊंटी क्रिकेट सामन्यांतील मैदानासारखेच बनून जायचे. हनू सोबत आणखीन खूप दर्जेदार लाल बाॅलचे बादशहा जरुर येऊन गेले व आजही आहेत परंतु पावसाळ्यातील लाल बाॅलचा ‘ॠतूराज’ म्हणावा तर फक्त हनू मालवणकर हेच नांव डोळ्यांसमोर येईल. तो टेनीस बाॅल क्रिकेटही उत्तम खेळायचा यात वाद नाही परंतु त्याच्या मोल मजुरीच्या कष्टप्रद कामामुळे त्याला लेदरबाॅल क्रिकेट साठी अख्खा दिवस नियमीत देणे शक्य नव्हते तरिही अगदी युवा वयात तो लेदरबाॅल क्रिकेट मनापासून खेळला होता. त्याचे क्रिकेटचे आकडेवारीसहीत ज्ञानही उत्तम होते आणि सोबतच रांगडी ताकद , विनोद बुद्धी व स्मितहास्य असे एक अजब काॅम्बिनेशन त्याच्याकडे होते.

पावसाच्या सर्द ओल्या ॠतूतील रविवार सकाळ सुरु झाली की मालवणातील क्रिकेट प्रेमींना हनू मालवणकर नक्कीच आठवत असणार. एरवी आठवडाभर जे रोज हनूला खेळताना पाहू शकत नसत ते आवर्जून रविवारी सकाळी छत्री सांभाळत बोर्डिंग ग्राऊंडच्या दिशेने कूच करीत असत. १९९२ ते २०१२ असा खूप मोठ्ठा काळ हनू मालवणकर नियमीत क्रिकेटशी नाते जपून होता. नंतरही तो खेळला पण त्यात तो मुक्त वाटत नसे कारण रोजी रोटीची चिंता व थोडे वाढते वय. क्रिकेटने त्याला आनंद दिला परंतु मालवण क्रिकेटसाठी त्याने नक्कीच आनंद भरभरुन वाटला तोही भर पावसाळ्यात…दुथडी भरभरुन..टोलेजंग फटकेबाजी करुन…लाल रबरी चेंडूवर! ओल्या चेंडूवरील हनूचे फटके अडवणारे क्षेत्ररक्षक सांगू शकतील की त्याची ताकद काय होती परंतु बहुतांश क्षेत्ररक्षक मैदानाबाहेरीलच असायचे..प्रेक्षक म्हणून कारण त्याच्या टोलेजंग फलंदाजीसाठी सीमारेषा तोकड्या ठरायच्या.

लाल रबरी बाॅलला कधीच कमी लेखू नये. क्रिकेटचा देव खुद्द सचिन तेंडुलकर सुद्धा नियमितपणे लाल रबरी चेंडूवर सराव करायचा आणि आजचा शुभमन गील सुद्धा करतो.

पावसाळी ॠतूतील बोर्डिंग ग्राऊंडवरील प्रत्येक गवताचे पाते आभाळाकडे पाहून नक्कीच म्हणत असेल की तुझ्यापर्यंत टोलेजंगपणे पोहोचणारा एक ॠतुराज मालवणात होता….तो हनू मालवणकर होता..!

(आज हनू हयात नाही. काही वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले. सध्या तो असता तर ४७ वर्षांचा असता तरी तो रांगडा उत्साही असता हे नक्की.)

आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

गडग्यावरुन क्रिकेट :भाग १

सुयोग पंडित | क्रिडा विशेष : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या बोर्डिंग ग्राऊंडवर अनेक प्रथमश्रेणी लेदर बाॅल क्रिकेट सामने खेळवले जातात. या मैदानाला टेनीस व लेदर बाॅल क्रिकेटचा दैदिप्यमान वारसा आहे. गेल्या वीस वर्षात तयार केलेली टर्फ खेळपट्टी आणि प्रयत्न पूर्वक कष्टाने जपले गेलेले हिरवे आऊटफिल्ड या सोयी निर्माण होण्यापूर्वीही मालवण शहरातून उत्तमोत्तम लेदर व टेनीस बाॅल खेळाडू निर्माण केले आहेत. त्या वेळी लाल खडी म्हणजे सकेरा आणि एखादी मोठी लेदर बाॅल स्पर्धा असली तर मैदानावर धूळ माती टाकून त्यावर मैदानभर रोलींग करुन स्पर्धा खेळवणे असे अपार कष्टही निव्वळ क्रिकेटच्या जोपासनेसाठी केलेला क्रिकेट प्रेमी ज्येष्ठ व युवकांचा क्लब आजही मालवणात कार्यरत आहे. लेदर बाॅल व टेनीस क्रिकेट हे संपूर्ण कोरड्या वातावरणात शक्य असतात. पावसाळ्यात याच मैदानावर 'लाल बाॅल' किंवा रबरी चेंडूंच्या क्रिकेटची एक वेगळीच मजा अनुभवायला येते. आजपासून ३० वर्षांपूर्वी ती मजा थोडी जास्त 'संख्येने' खेळून व पाहून अनुभवली जात होती त्याला कारण या पावसाळी ॠतू मधला एक 'ॠतूराज' त्याच्या टोलेजंग फटकेबाजीने अवघ्या मालवणातील लहान मोठा क्रिकेट प्रेमी त्याचा खेळ पहायला मैदानाकडे छत्री सावरत किंवा भिजत देखील उभा रहायचा…अगदी बोर्डिंग ग्राऊंडच्या गडग्यावरुन, विहीरीकरडून, दादा बिडयेंच्या घरासमोरच्या झाडाच्या आसर्याला उभे राहून, टेक्निकल बिल्डिंगच्या व्हरांड्यात किंवा जागा मिळेल तिथून त्या ॠतूराजाची 'पावसाळी फटकेबाजी' अनुभवणे हा एक अवर्णनीय आनंद होता. रबरी चेंडूच्या त्या ॠतूराजाचे नांव होते हनू मालवणकर. मालवण शहरातील सुप्रसिद्ध अशा अ.शि.दे. टोपीवाला हायस्कूलच्या 'अ' व 'ब' तुकड्यांमध्ये शिकत मोठा झालेला एक हुशार विद्यार्थी अशी सुद्धा त्याची एक ओळख आहे हे खूप कमी जण जाणत असतील. भूमिती, भौतिक शास्त्र व चित्रकला विषयांत तो अचाट होता …म्हणजेच त्याला 'डायमेन्शनस्' व 'वस्तुमान,आकारमान,घनता,घर्षण' याची जन्मजात जाण होती. म्हणूनच तर लाल रबर बाॅल ओला झाल्या नंतर तो कसा टाईम करावा, चेंडूच्या लाईन लेंन्थ प्रमाणे तो कुठल्या दिशेला टोलवावा आणि त्याच्या उसळणार्या तत्वाला थेट टोलेजंग कसे धाडावे हे हनू मालवणकर करु शकत होता.

त्यावेळी पावसाळ्यातील बोर्डिंग ग्राऊंड हे कांगा लीगची किंवा काऊंटी क्रिकेट सामन्यांतील मैदानासारखेच बनून जायचे. हनू सोबत आणखीन खूप दर्जेदार लाल बाॅलचे बादशहा जरुर येऊन गेले व आजही आहेत परंतु पावसाळ्यातील लाल बाॅलचा 'ॠतूराज' म्हणावा तर फक्त हनू मालवणकर हेच नांव डोळ्यांसमोर येईल. तो टेनीस बाॅल क्रिकेटही उत्तम खेळायचा यात वाद नाही परंतु त्याच्या मोल मजुरीच्या कष्टप्रद कामामुळे त्याला लेदरबाॅल क्रिकेट साठी अख्खा दिवस नियमीत देणे शक्य नव्हते तरिही अगदी युवा वयात तो लेदरबाॅल क्रिकेट मनापासून खेळला होता. त्याचे क्रिकेटचे आकडेवारीसहीत ज्ञानही उत्तम होते आणि सोबतच रांगडी ताकद , विनोद बुद्धी व स्मितहास्य असे एक अजब काॅम्बिनेशन त्याच्याकडे होते.

पावसाच्या सर्द ओल्या ॠतूतील रविवार सकाळ सुरु झाली की मालवणातील क्रिकेट प्रेमींना हनू मालवणकर नक्कीच आठवत असणार. एरवी आठवडाभर जे रोज हनूला खेळताना पाहू शकत नसत ते आवर्जून रविवारी सकाळी छत्री सांभाळत बोर्डिंग ग्राऊंडच्या दिशेने कूच करीत असत. १९९२ ते २०१२ असा खूप मोठ्ठा काळ हनू मालवणकर नियमीत क्रिकेटशी नाते जपून होता. नंतरही तो खेळला पण त्यात तो मुक्त वाटत नसे कारण रोजी रोटीची चिंता व थोडे वाढते वय. क्रिकेटने त्याला आनंद दिला परंतु मालवण क्रिकेटसाठी त्याने नक्कीच आनंद भरभरुन वाटला तोही भर पावसाळ्यात…दुथडी भरभरुन..टोलेजंग फटकेबाजी करुन…लाल रबरी चेंडूवर! ओल्या चेंडूवरील हनूचे फटके अडवणारे क्षेत्ररक्षक सांगू शकतील की त्याची ताकद काय होती परंतु बहुतांश क्षेत्ररक्षक मैदानाबाहेरीलच असायचे..प्रेक्षक म्हणून कारण त्याच्या टोलेजंग फलंदाजीसाठी सीमारेषा तोकड्या ठरायच्या.

लाल रबरी बाॅलला कधीच कमी लेखू नये. क्रिकेटचा देव खुद्द सचिन तेंडुलकर सुद्धा नियमितपणे लाल रबरी चेंडूवर सराव करायचा आणि आजचा शुभमन गील सुद्धा करतो.

पावसाळी ॠतूतील बोर्डिंग ग्राऊंडवरील प्रत्येक गवताचे पाते आभाळाकडे पाहून नक्कीच म्हणत असेल की तुझ्यापर्यंत टोलेजंगपणे पोहोचणारा एक ॠतुराज मालवणात होता….तो हनू मालवणकर होता..!

(आज हनू हयात नाही. काही वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले. सध्या तो असता तर ४७ वर्षांचा असता तरी तो रांगडा उत्साही असता हे नक्की.)

आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल.

error: Content is protected !!