24.4 C
Mālvan
Sunday, December 22, 2024
IMG-20240531-WA0007

मालवणच्या भंडारी हायस्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे सर्वांगीण समुपदेशन.

- Advertisement -
- Advertisement -

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त बॅरिस्टर नाथ पै सेवांगण संस्थेचा उपक्रम ..

समुपदेशक सोनाली ओगले,तज्ञ समाजसेविका वंदना करंबेळकर यांचे विशेष मार्गदर्शन ..

मालवण | वैभव माणगांवकर : सध्याचे युग हे तंत्रज्ञान युग आहे. साधनांची भरपूर उपलब्धता असली तरिही मानसिक आरोग्याच्या मार्गदर्शनाखेरीज त्या साधनांची नेमकी उपयुक्तता ही समाजातील सर्व घटकांपर्यंत त्यांच्या हीतासाठी जपली जाणार नाही .म्हणून या युगामध्ये शालेय वयातच योग्य ती सक्षम आरोग्याची बिजे पेरली गेली पाहिजेत. या पार्श्वभूमीवर मालवणच्या भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या प्रशालेत जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त सामाजिक व मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत अशा तज्ञांच्या मार्गदर्शनाचा उपक्रम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अशा एका कार्यक्रमातून साजरा करण्यात आला. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण संचलित कौटुंबिक सल्ला केंद्रातर्फे भंडारी ए. सो. हायस्कुल मध्ये मानसिक आरोग्य विषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी समुपदेशक सोनाली ओगले या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, मुख्याध्यापक व्ही. जी. खोत, आहार तज्ञ डॉ. गार्गी ओरसकर, प्रकाश कुशे, कोलगाव निरामयच्या सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबळेकर, मनोजकुमार गिरकर आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना समुपदेशक सोनाली ओगले म्हणाल्या की शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक आरोग्यावर प्रत्येक व्यक्तीच्या मनाचे आरोग्य अवलंबून असते. आपण जसे आहोत तसे स्वतःला स्विकारता आले पाहिजे. मनातील भावनांचा प्रवाह हा मध्यम ठेवून भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. तसेच दुसऱ्यांच्या भावनांची जाणीव आपल्याला असली पाहिजे. या सर्व गोष्टी आपण उत्तम रित्या जोपासू तेव्हाच आपण मानसिक दृष्ट्या परिपक्व होऊ शकतो. मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी रोज व्यायाम, सकस आहार व पुरेशी झोप आवश्यक आहे असेही त्या म्हणाल्या. यावेळी वंदना करंबळेकर यांनी मागर्दशन करताना मुलांनी आपल्यातील कौशल्यावर मेहनत घेऊन ते विकसित करावे, असे सांगितले. मुख्याध्यापक व्ही. जी. खोत यांनी जे काम कराल त्यात स्वतःला झोकून देऊन काम करा असे सांगितले. तर डॉ. गार्गी ओरसकर यांनी मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी आहाराचे असलेले महत्व विशद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अदिती कुडाळकर हिने केले. या कार्यक्रमास भंडारी हायस्कूलमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!