मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या दहिबाव-बागमळा गांवात ‘सिद्धीविनायक रिअल इस्टेट ग्रुप व ग्रामस्थ’ यांच्या सहकार्याने सर्व प्राथमिक शाळा, हायस्कूल तसेच मिठबाव येथील फाटकवाडी व शेगुलवाडी येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप श्री देव महादेश्वर मंदिर येथे करण्यात आले.
यावेळी व्यासपिठावर दहिबाव-बागमळा सरपंच सचिन नाचणकर, उपसरपंच देवानंद खोत, सिद्धीविनायक रिअल इस्टेटचे किशोर
रेवडेकर, ग्रा.प. सदस्य विजय परब, अभया शेट्ये, समिक्षा दहिबावकर, दिव्या रुमडे, किशोर दुधवडकर, माजी ग्रा.प.सदस्या दहिबावकर, सिद्धी विनायक रिअल इस्टेटचे सदस्य संतोष माने, सूर्यप्रकाश सूर्वे सुनिल नाईक, जितेंद्र सावंत सर्व जि.प. शाळा मुख्याध्यापक, शिक्षक व मान्यवर उपस्थित होते. सिद्धीविनायक ग्रुपच्या वतीने प्रतिवर्षी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. त्यांच्या या दातृत्वाने भविष्यात अनेक यशस्वी विद्यार्थी घडणार असून ते सुद्धा याउपक्रमाचे अनुकरण करतील असा विश्वास यावेळी मुख्याध्यापक शिंदे सर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. शाळांच्या मागणीनुसार दळवीवाडी शाळा क्र. १ आणि बागमळा शाळा यांना किशोर रेवडेकर यांनी आई कै. उर्मिला सदानंद रेवडेकर हिच्या स्मरणार्थ कपाट भेट म्हणून दिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद परब यांनी तर आभार मुख्याध्यापिका अदिती राणे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिपक खोत, नरेश नार्वेकर, गणेश टेंबवलकर, बाळा शेट्ये, प्रियांका पाटकर यांनी विशेष परिश्रम घेतले.