रोटरी क्लब ऑफ वैभववाडीची एका अनोख्या उपक्रमाने शैक्षणिक वर्षाची सुरवात ; उंबर्डे उर्दू शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना केले छत्र्यांचे वाटप.
नवलराज काळे | सहसंपादक : सामाजीक मदतीच्या उपक्रमांतून संपूर्ण जिल्ह्यात ज्या संस्थेने आपले स्थान ठळक केले अशा रोटरी क्लब ऑफ वैभववाडी शाखेचा चालू शैक्षणिक वर्षातील पहिला उपक्रम ठरला तो उंबर्डे येथील उर्दू शाळेत गरजू विद्यार्थ्यांना छत्री वाटप.
नेहमी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहून रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे अध्यक्ष संतोष टक्के व त्यांचे सहकारी समाजातील वंचित शोषित घटकांना न्याय देण्याचे काम करीत असतात. शैक्षणिक आरोग्य व इतर सामाजिक क्षेत्रामध्ये रोटरी क्लब ऑफ वैभववाडीचे कार्य उल्लेखनीय आहे.
त्यांचा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून उंबर्डे येथील गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी छत्री वाटपाचा कार्यक्रम केला. या उपक्रमाची तालुक्यात सर्वत्र प्रशंसा होत आहे.
या कार्यक्रमावेळी रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे अध्यक्ष संतोष टक्के सेक्रेटरी संजय रावराणे, सचिन रावराणे, प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.