22.8 C
Mālvan
Monday, November 25, 2024
IMG-20240531-WA0007

ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर आलेल्या भरधाव डंपर मागील कारण ‘घात की चालकाचे अनावधान’ याची पोलिस चौकशी सुरु..!

- Advertisement -
- Advertisement -

ब्युरो न्यूज | धाराशीव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आघाडीचे नेते व धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर डंपर घालण्याचा संशयास्पद प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ओमराजे काल सकाळी ७ वाजता मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असतानाच गोवर्धनवाडी येथे घडली. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या प्रकरणी ढोकी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी डम्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रामेश्वर बंडू कांबळे (रा.अंबाजोगाई, जि. बीड) असे गुन्हा दाखल झालेल्या डंपर चालकांचे नाव आहे. या घटनेमागे घातपात आहे का याचा तपास पोलिसाकडून सुरु आहे.खासदार ओमराजे निंबाळकर हे काल मॉर्निंग वॉकसाठी गोवर्धनवाडी येथील त्यांच्या घरापासून काही अंतरावरच चालायला गेले होते. यावेळी घरी परतत असतानाच भरधाव डंपर त्यांच्या दिशेने येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी डम्पर चालकाच्या हातात मोबाईल होता. तर तो त्याची डावी बाजू सोडून उजव्या बाजूने येत असल्याने ओमराजे यांनी पाहीले आणि रस्त्याच्या खाली उडी मारली. तेव्हा डंपर भरधाव वेगात पुढे निघून गेला. खासदार निंबाळकर यांनी या घटनेनंतर पाठीमागून येत असलेल्या मोटरसायकलवर बसून डम्पर (क्रमांक एमएच ४४ के ८८४४)चा पाठलाग करून त्याला रेल्वे गेट परिसरात त्याला पकडले. डंपर चालकाला खासदार निंबाळकर आणि गावातील ग्रामस्थांनी जाब विचारला. तसेच त्याला घेऊन पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. ही घटना चालकाच्या अनावधानाने तथा चुकीमुळे झाली की यामागे काही घातपाताचा हेतू होता याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर खासदार झाल्यानंतर आमदार कैलास पाटील यांच्या प्रचारार्थ २०१९ मध्ये धाराशीव तालुक्यातील पाडोळी येथे गेल्यानंतर खासदार ओमराजे यांच्यावर चाकू हल्ला झाला होता त्यामुळे ह्या घटनेकडे संशयास्पद रित्या पाहिले जात असल्याचे खासदार ओमराजेंच्या निकटवर्तीयांकडून समजते आहे असे सूत्रांनी सांगितले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!