बांदा : राकेश परब
बांदा नट वाचनालयात ३५० वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शौर्याचा मूर्तिमंत पुतळा, न्यायाचा आणि शिस्तीचा आदर्श, गरिबांचा कैवारी, म्हणून त्यांचा उदो उदो होतो. ६जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर एका भव्य समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचे राजे म्हणून राज्याभिषेक झाला. हा राज्याभिषेक काशी क्षेत्री प्रसिद्ध असलेले पंडित गागाभट्ट यांनी वैदिक विधीनुसार केला.
या कार्यक्रमात छत्रपतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व माननीय विद्यमान अध्यक्ष एस आर सावंत यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमास संचालक जगन्नाथ सातोस्कर, हेमंत मौर्य, सौ. स्वप्निता सावंत , प्रकाश पांढरे सर् , अंकुश यात गावकर , अनंत भाटे, गणपत नाईक, ग्रंथपाल सौ प्रमिला मोरजकर/नाईक , सौ अनिता परब, सुनील नातू उपस्थित होते. अनंत भाटे व अध्यक्ष एस आर सावंत यांनी छत्रपतीं बद्दल आपले विचार मांडले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिव राकेश केसरकर यांनी मानले.