बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथील युवा सामाजिक कार्यकर्ता निलेश कदम यांनी नुकतेच आपल्या वाढदिवसच्या निमित्ताने बांदा शहरातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पालकत्व स्वीकारत एक वेगळा आदर्श समाजासमोर
ठेवला. निलेश कदम नेहमीच आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम दरवर्षी करत आहेत. मागील वर्षी त्यांनी आरोग्य विषयक उपक्रम राबवला होता . यावर्षी त्यांनी शैक्षणिक उपक्रम हाती घेत बांदा परिसरातील गरीब व होतकरू मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. हा कार्यक्रम नुकताच बांदा प्राथमिक शाळेत संपन्न झाला.

बांदा उपसरपंच जावेद खतीब यांनी ही आपल्या मनोगतात म्हणाले की निलेश कदम अशा प्रकारचे उपक्रम उत्कृष्ट पद्धतीने राबवत आहेत व आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने काम केल्यास निश्चितच समाजशील समाज उभा राहू शकतो. या वेळी बांदा पोलिस निरीक्षक शामराव काळे, तलाठी वर्षा नाडकर्णी, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, श्रेया केसरकर, माजी सरपंच बाळा आकेरकर यांनी मनोगत व्यक्त केले. नेमळे माजी सरपंच विनोद राऊळ, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे, आबा धारगळकर, माजी सदस्य मकरंद तोरसकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, सिद्धेश महाजन, डेगवेचे माजी सरपंच प्रवीण देसाई, बाबा काणेकर, शैलेश केसरकर, संदीप बांदेकर, नीलेश देसाई, साई धारगळकर, साहिल कल्याणकर, ऋषी हरमलकर, सुनील धामापूरकर, राकेश परब, सिद्धेश नाईक, सागर सावंत, पनो येडवे आदींसह विद्यार्थी, पालक उपस्थित होते. यावेळी कदम यांचा वाढदिवस साजरा करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

या १० मुलांसह कदम यांनी उमेद फाउंडेशनच्या विद्यार्थी दत्तक योजनेअंतर्गत अजून २ विद्यार्थी दत्तक घेतले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे. डी. पाटील यांनी केले.