महाराष्ट्र राज्यातील आणि केंद्रातील अनेक सर्वपक्षीय दिग्गज आले एकाच मंचावर….!
ब्यूरो न्यूज | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रगतीमध्ये आगामी काळात घसघशीत कामगिरी बजावू शकण्याची आशा असणार्या बहुचर्चित सिंधुदुर्ग विमानतळाचे लोकार्पण आज मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण
राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यमंत्री, नागरी विमान
वाहतूक, जनरल (डॉ.) बी. के. सिंह (सेवानिवृत्त), महसूल मंत्री
बाळासाहेब थोरात, उद्योग, खनिकर्म व मराठी भाषा मंत्री
सुभाष देसाई, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यटन, , पर्यावरण,
राजशिष्टाचार, मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे,
राज्यसभा सदस्य सुरेश प्रभू, विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे,
विधानसभा सदस्य दीपक केसरकर, नागरी विमान वाहतूक सचिव
राजीव बन्सल, विधानपरिषद सदस्य बाळाराम पाटील, विधानसभा
सदस्य वैभव नाईक, अप्पर मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंह,
विभागीय आयुक्त कोकण विभाग विलास पाटील, जिल्हा परिषद
अध्यक्ष संजना सावंत, लोकसभा सदस्य विनायक राऊत,
विधानपरिषद सदस्य अनिकेत तटकरे, विधानसभा सदस्य नितेश राणे,
प्रधान सचिव, विमानचालन, पर्यटन व राज्य उत्पादन शुल्क मंत्री
वल्सा नायर सिंह, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, उपाध्यक्ष आणि
व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी दीपक
कपूर आदी उपस्थित होते.