पणजी । सिद्धेश चव्हाण : शेजारील गोवा राज्यात कामासाठी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांचा प्रश्न गंभीर असल्याने गोवा राज्यात दोडामार्ग, पत्रादेवी चेक नाक्यावरून जाताना या युवक युवतींना आर.टी.पी.सी.आर टेस्ट किंवा कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्यामुळे या युवकांना या सक्तीतून मुक्तता मिळावी यासाठी महाराष्ट्र भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग भाजपा शिष्टमंडळाने गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. त्यानुसार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जिल्हाधिकारी व पोलिस महानिरिक्षकांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाड्यांना तपासणीत शिथिलता द्या असे आदेश दिले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग भाजपची शिष्टाई यशस्वी ठरली.
यावेळी जावेद खतीब, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत, युवा मोर्चा उपाध्यक्ष चेतन चव्हाण, दोडामार्ग तालुकाध्यक्ष दिपक गवस, जिल्हा बॅक संचालक गुरुनाथ पेडणेकर, तालुका उपाध्यक्ष बाळू सावंत, संदीप बांदेकर, सरचिटणीस मधुकर देसाई, सदस्य विनेश गवस, साई धारगळकर, शहर अध्यक्ष साई सावंत उपस्थित होते.