चिंदर | विवेक परब: राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत, मालवण पंचायत समितीचे (गण -पळसंब), गणस्तरीय प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रमचे उदघाटन पळसंब समाज मंदिर येथे आज करण्यात आले यावेळी पंचायत समिती सदस्य -मा.श्री.अशोक बागवे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच पंचायत समिती विस्तार अधिकारी मा.श्री.पी.डी.जाधव ,पळसंब सरपंच श्री.चंद्रकांत गोलतकर,उपसरपंच श्री.सुहास सावंत,ग्रा.पं.सदस्य श्री.अरुण माने,श्रीम.उज्ज्वला परब,श्रीम.प्रणिता पुजारे,बांदिवडे बुद्रुक सरपंच श्रीम.रविना प्रभू,उपसरपंच किरण पवार,बांदिवडे खुर्द सरपंच श्री.रमेश आत्माराम तोरसकर,बांदिवडे खुर्द उपसरपंच ,बांदिवडे ग्रामसेवक श्री.एच .बी.तांबे ,मुख्याध्यापक,आरोग्य सेवक,केंद्रचालक,अंगणवाडी सेविका,आशा सेविका ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते . पळसंब श्री.अमित कांबळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले व कार्यक्रमाची सांगता सर्वांचे आभार मानून करण्यात आली.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -