26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

गावराई-सुकळवाड येथील ओम् साई मंदिराच्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

२८ ते ३० एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावराई-सुकळवाड येथील ओम् साई मंदिराचा वर्धापन दिन सोहळा २८ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान आयोजीत केला जात आहे. या दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२८ एप्रिलला सकाळी ७ वाजता साई चरीत्र पारायण वाचन समारोप होईल. ८ वाजता श्री साईंचा अभिषेक केला जाईल. दुपारी १२:३० वाजता आरती , ३ ते ६ श्री बाई पालखीची भव्य मिरवणूक नंतर संध्याकाळी ७ वाजता दीपोत्सव व महाआरती होईल.

रात्री ७:३० वाजता खुल्या रेकाॅर्ड डान्स स्पर्धा आणि रात्री १० वाजता महिलांसाठी विशेष असा ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम आयोजीत केला गेला आहे. सुप्रसिद्ध मनोरंजन तज्ञ,गायक व सूत्रसंचालक श्री समीर चर्हाटकर हे हा कार्यक्रम संचलीत करतील.

शनिवारी २९ एप्रिलला ९ ते १२ नवग्रह शांती, दुपारी १२ वाजता आरती, ३ ते ६ नामःस्मरण,७ वाजता दीपोत्सव व महाआरती,रात्री ८ वाजता ट्रीकसीनसहीत ‘स्वामी ब्रम्हांडनायक’ हा नाट्यप्रयोग सादर केला जाईल.

३० एप्रिलला सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा,१२:३० आरती, १ ते ३ महाप्रसाद ,२ ते ४ हळदीकुंकू, ४ ते ६ नामःस्मरण, ७ वाजता दीपोत्सव व महाआरती, ७:३० ते ८ साईदिंडी, रात्री ८ वाजता दशावतारी पौराणीक नाट्यप्रयोग ‘अकल्पासूर’ सादर होईल.

या सर्व सोहळ्याला जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन ‘ओम् साई सेवा समिती, गावराई-सुकळवाड यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

२८ ते ३० एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावराई-सुकळवाड येथील ओम् साई मंदिराचा वर्धापन दिन सोहळा २८ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान आयोजीत केला जात आहे. या दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२८ एप्रिलला सकाळी ७ वाजता साई चरीत्र पारायण वाचन समारोप होईल. ८ वाजता श्री साईंचा अभिषेक केला जाईल. दुपारी १२:३० वाजता आरती , ३ ते ६ श्री बाई पालखीची भव्य मिरवणूक नंतर संध्याकाळी ७ वाजता दीपोत्सव व महाआरती होईल.

रात्री ७:३० वाजता खुल्या रेकाॅर्ड डान्स स्पर्धा आणि रात्री १० वाजता महिलांसाठी विशेष असा 'खेळ पैठणीचा' हा कार्यक्रम आयोजीत केला गेला आहे. सुप्रसिद्ध मनोरंजन तज्ञ,गायक व सूत्रसंचालक श्री समीर चर्हाटकर हे हा कार्यक्रम संचलीत करतील.

शनिवारी २९ एप्रिलला ९ ते १२ नवग्रह शांती, दुपारी १२ वाजता आरती, ३ ते ६ नामःस्मरण,७ वाजता दीपोत्सव व महाआरती,रात्री ८ वाजता ट्रीकसीनसहीत 'स्वामी ब्रम्हांडनायक' हा नाट्यप्रयोग सादर केला जाईल.

३० एप्रिलला सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा,१२:३० आरती, १ ते ३ महाप्रसाद ,२ ते ४ हळदीकुंकू, ४ ते ६ नामःस्मरण, ७ वाजता दीपोत्सव व महाआरती, ७:३० ते ८ साईदिंडी, रात्री ८ वाजता दशावतारी पौराणीक नाट्यप्रयोग 'अकल्पासूर' सादर होईल.

या सर्व सोहळ्याला जास्तीत जास्त भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन 'ओम् साई सेवा समिती, गावराई-सुकळवाड यांनी केले आहे.

error: Content is protected !!