केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण,आमदार नितेशजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी ठाकरे गटाच्या ३ विद्यमान नगरसेवक भाजपात सामिल.
नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाभवे नगरपंचायत चे शिवसेना ठाकरे गटाचे दोन विद्यमान नगरसेवक श्री. प्रदीप रावराणे व नगरसेविका सौ. श्रद्धा रावराणे व ठाकरे गटाला समर्थन असणारे अपक्ष नगरसेवक श्री सुभाष रावराणे यांच्यासहित शिवसेना ठाकरे गट वैभववाडी युवा तालुकाप्रमुख श्री रोहित रावराणे यांचा भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश झाला.

हा प्रवेश केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण व कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून भारतीय जनता पार्टीची नगरपंचायतीची मधील ताकद अधिक प्रबळ झाली आहे.
या प्रवेशाच्याप्रसंगी श्री.संताजी रावराणे,आशिष रावराणे,श्री.प्रशांत रावराणे आदी उपस्थितीत होते.