म.न.वि.से.दिंडोशी विधानसभा आयोजीत मालाड येथे संपन्न झाली भव्य वक्तृत्व स्पर्धा.
बांदा | राकेश परब ( मालवण | सुयोग पंडित) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील बाल प्रतिभावंत कु. नील नितीन बांदेकरच्या बक्षिसांच्या यादीत आणखीन एका राज्यस्तरीय बक्षिसाची नोंद झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना दिंडोशी विधानसभा आयोजित वक्तृत्व स्पर्धेत बांदा केंद्र शाळेचा, इयत्ता चौथीत शिकणारा विद्यार्थी कु.नील नितीन बांदेकर या विद्यार्थ्याने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
वक्तृत्वाचा विषय ‘छत्रपती शिवरायांचे बालपण’ असा होता.
ही स्पर्धा ऑनलाइन घेण्यात आली होती. या स्पर्धेच्या निकालाच्या वेळी लोकाग्रहास्तव कु. नीलचा व्हिडिओ मोठ्या पडद्यावर दाखवला गेला तेव्हा, प्रेक्षकांकडून प्रचंड प्रशंसा झाली.
नीलने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन १३२ बक्षिसे पटकाविली आहेत . त्याच्या सर्वंकष यशात बांदा केंद्र शाळेतील समस्त शिक्षक वृंद ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर यांचे प्रोत्साहन आणि आई-वडील श्री व सौ गौरी नितीन बांदेकर यांचा मोलाचा असा सहभाग असतो. कु.नील बांदेकर याच्या या यशाची जिल्ह्यातील शैक्षणिक,सांस्कृतिक आणि सर्व सामाजिक स्तरातून प्रशंसा होत आहे.