चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा ग्रामपंचायतचे कर्मचारी निलेश सीताराम वराडकर यांचे सोमवारी मालवण येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. आज मंगळवारी सकाळी आचरा हिर्लेवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले.
शांत, सुस्वभावी, प्रामाणिक, विश्वासू या गुणांसाठी ते सुपरिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी चुलत नातेवाईक असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने आचरा पंचक्रोशीत शोक व्यक्त होत आहे.