उत्सव ज्ञानाचा व ध्यास समृद्धीचा ठेवून घडतोय शाळेत शिक्षण जागर.
विशेष | सुयोग पंडित ( मुख्य संपादक ) : ‘तुझ्यामुळे घडलो आम्ही’ अशी कृतज्ञता व्यक्त करून शाळेतील शैक्षणिक सुखसोई व शैक्षणिक सक्षमीकरण यासाठी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सांगुळवाडीचा माजी विद्यार्थी व आजी माजी शिक्षक वर्ग, ग्रामस्थ वृंद सुप्रसिद्ध आहे.
येत्या शनिवारी १५ एप्रिलला या शाळेच्या सभागृह उद्घाटन व इमारत हस्तांतरण सोहळा संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून सरपंच सौ.पूजा जितेंद्र रावराणे असून या शाळेतील समाजप्रीय तज्ञ निवृत्त शिक्षिका श्रीमती सुनंदा बा.रावराणे, निवृत्त शिक्षक रा.वि.पाटील, निवृत्त शिक्षणाधिकारी पि.टी.पाटील आणि कसवण तळवडेचे गृप ग्रामपंचायत सरपंच व माजी उपमुख्याध्यापक मिलिंद सर्पे हे प्रमुख उद्घाटक आहेत.
अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत १५ एप्रिलला सकाळी ११ ते १ संपन्न होणार्या या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहायचे आवाहन करण्यात आले आहे.