25.6 C
Mālvan
Sunday, December 22, 2024
IMG-20240531-WA0007

जिल्ह्यातील धार्मिक स्थळे आजपासून खुली…!

- Advertisement -
- Advertisement -

आंगणेवाडीतील भराडी देवीच्या भाविकांना सत्तावीस ऑक्टोबपर्यंत करावी लागणार प्रतिक्षा…..!

ब्युरो रिपोर्ट | वैभव माणगांवकर : जिल्ह्यात आज 7 ऑक्टोबर घटस्थापनेपासून 887 मंदीरांसह इतर धार्मीक स्थळे दर्शनासाठी उघडली जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर शासने नियमावली जाहीर केली आहे .जिल्हात तबल दिड वर्षा नंतर 839 मंदिर 12 चर्च आणि 36 मशीदी खुल्या होणार आहेत त्यामुळे सर्वत्र उत्सव उत्साहाचेच वातावरण आहे. धार्मीक स्थळे उघडणार असल्याने गेले दोन दिवस तेथे साफ सफाई ,रंग रंगोटीची व तत्सम कामे सुरू आहेत.
तसेच शासनानच्या नियमाने ही सर्व धार्मिक स्थळे उघडली असून या स्थानांवर एकूण क्षमतेपेक्षा 50 टक्के एवढी उपस्थिती असावी ,मास्क वापर सोशल डिस्टन्सही असेने बंधनकारक राहणार आहे. कोणत्याही व्यक्तीने या नियमाची पालन केले नाही तर त्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51 ते 60 भारतीय दंड संहित 1860 मधील कलम 188 असे लागू होणार आहे .कंटेनमेंट झोन नसलेल्या ठिकाणीच धार्मिक स्थळे सुरू केली आहेत. मास्क चा वापर 6 फूटांचे सुरक्षीत अंतर आणि सॅनिटायझर बंधनकारक आहे. मूर्ती व धार्मिक प्रतिकाला हात न लावता दर्शन घावे ,गर्दी टाळावी ,गरोदर स्त्रिया तसेच 10 वर्षा खालील मुलांनी शक्तोय धार्मिक जागी जाणे टाळावे. जरी कोरोना चे रुग्ण कमी झाले असले तरी संकट कायम असल्याने परवानगी देताना नियम पाळणे बंधनकारक आहे. ही परवानगी देताना आपापल्या कार्य क्षेत्र त कोरोंना स्थिती चा आढावा घेऊन स्थानिक प्रशासनने निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आपल्या कार्य श्रेत्रासाठी नियमावली जाहीर करून ही परवानगी दिली आहे. जिल्ह्यात मालवण तालुक्यातील आंगणेवाडी देवीचे मंदिर मात्र दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी दर्शनासाठी खुले होणार असल्याची माहिती देवस्थान व्यवस्थापन मंडळातर्फे आधीच जाहीर करण्यात आलेली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आंगणेवाडीतील भराडी देवीच्या भाविकांना सत्तावीस ऑक्टोबपर्यंत करावी लागणार प्रतिक्षा.....!

ब्युरो रिपोर्ट | वैभव माणगांवकर : जिल्ह्यात आज 7 ऑक्टोबर घटस्थापनेपासून 887 मंदीरांसह इतर धार्मीक स्थळे दर्शनासाठी उघडली जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर शासने नियमावली जाहीर केली आहे .जिल्हात तबल दिड वर्षा नंतर 839 मंदिर 12 चर्च आणि 36 मशीदी खुल्या होणार आहेत त्यामुळे सर्वत्र उत्सव उत्साहाचेच वातावरण आहे. धार्मीक स्थळे उघडणार असल्याने गेले दोन दिवस तेथे साफ सफाई ,रंग रंगोटीची व तत्सम कामे सुरू आहेत.
तसेच शासनानच्या नियमाने ही सर्व धार्मिक स्थळे उघडली असून या स्थानांवर एकूण क्षमतेपेक्षा 50 टक्के एवढी उपस्थिती असावी ,मास्क वापर सोशल डिस्टन्सही असेने बंधनकारक राहणार आहे. कोणत्याही व्यक्तीने या नियमाची पालन केले नाही तर त्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51 ते 60 भारतीय दंड संहित 1860 मधील कलम 188 असे लागू होणार आहे .कंटेनमेंट झोन नसलेल्या ठिकाणीच धार्मिक स्थळे सुरू केली आहेत. मास्क चा वापर 6 फूटांचे सुरक्षीत अंतर आणि सॅनिटायझर बंधनकारक आहे. मूर्ती व धार्मिक प्रतिकाला हात न लावता दर्शन घावे ,गर्दी टाळावी ,गरोदर स्त्रिया तसेच 10 वर्षा खालील मुलांनी शक्तोय धार्मिक जागी जाणे टाळावे. जरी कोरोना चे रुग्ण कमी झाले असले तरी संकट कायम असल्याने परवानगी देताना नियम पाळणे बंधनकारक आहे. ही परवानगी देताना आपापल्या कार्य क्षेत्र त कोरोंना स्थिती चा आढावा घेऊन स्थानिक प्रशासनने निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आपल्या कार्य श्रेत्रासाठी नियमावली जाहीर करून ही परवानगी दिली आहे. जिल्ह्यात मालवण तालुक्यातील आंगणेवाडी देवीचे मंदिर मात्र दिनांक सत्तावीस ऑक्टोबर रोजी दर्शनासाठी खुले होणार असल्याची माहिती देवस्थान व्यवस्थापन मंडळातर्फे आधीच जाहीर करण्यात आलेली आहे.

error: Content is protected !!