29.3 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आरसीबी च्या जेसीबी समोर मुंबई इंडियन्स भुईसपाट ; आय.पि. एल मध्ये गेली सलग ११ वर्षे पहिला सामना हरायचा मुंबई इंडियन्सचा सिलसिला कायम.

- Advertisement -
- Advertisement -

सुपर संडेच्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सन रायजर्स हैदराबादला एकतर्फी नमवले.

क्रीडा वृत्त | सुयोग पंडित : टाटा आयपीएल २०२३ च्या पहिल्याच सुपर संडेचे दोन्ही सामने एकतर्फी झाले. पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सन रायजर्स हैदराबादला त्यांच्याच मैदानावर तब्बल ७२ धावांनी पराभूत केले. कर्णधार संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि जाॅस बटलर यांची झंझावाती अर्धशतके आणि नंतर यजुवेंद्र चहलचे ४ बळी ही सामन्याची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली. राजस्थान रॉयल्सच्या २०३ धावांसमोर सन रायजर्स हैदराबाद संघ केवळ ८ गडी गमावून १३८ धावांपर्यंत मजल मारू शकला. २२ चेंडूत ५४ धावा ठोकणारा जाॅस बटलर सामनावीर ठरला.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन
२३ चेंडूत ५४ धावा कुटणारा सामनावीर जाॅस बटलर

सुपर संडेचा दुसरा सामना हा स्पर्धेतील बहुप्रतीक्षित असा रॉयल चॅलेंजर्स बेंगरूळू विरुद्ध मुंबई इंडियन्स दरम्यान बेंगरूळूच्या चिन्नास्वामी मैदानावर खेळला गेला ज्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरूकडून तथा आर सी बीच्या जेसीबी समोर मुंबई इंडियन्स संघ पुरता भुईसपाट झाला.

आरसीबीच्या विजयाचे शिल्पकार सामनावीर कर्णधार डुप्लेसिस आणि विराट कोहली

आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहली यांच्या झंझावती अर्धशकती खेळीच्या जोरावर आयपीएल स्पर्धेत काल रविवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरूने मुंबई इंडियन्स वर दणदणीत विजय मिळवला.
मुंबई इंडियन्सने दिलेले १७२ धावांचे लक्ष्य रॉयल चॅलेंजर बंगळुरूने १६:२ षटकांत १७२ धावा करत पूर्ण केले.

रॉयल चॅलेंजर बंगळुरूकडून विराट कोहलीने ४८ चेंडूत नाबाद ८२ धावांची खेळी करत संघाला लीलया विजय मिळवून दिला. त्याने त्याच्या खेळीत ५ षटकार आणि ६ चौकार लगावले. कर्णधार फाफ डुप्लेसिसने ४३ चेंडूत ७३ धावांची सहज तुफानी खेळी केली. त्याच्या खेळीत ५ चौकार आणि ६ षटकार मारले गेले. डुप्लेसिस बाद झाल्यानंतर आलेल्या दिनेश कार्तिकला खातेही उघडता आले नाही. ३ चेंडूंचा सामना करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. कॅमेरून ग्रीनच्या गोलंदाजीवर तो तिलक वर्माकरवी झेलबाद झाला. कार्तिकनंतर ग्लेन मॅक्सवेल आला. त्याने ३ चेंडूत नाबाद १२ धावांची खेळी करत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. कर्णधार फाफ डुप्लेसिसला सामनावीराचा मान मिळाला.

तत्पूर्वी, कर्णधार रोहित शर्मासह प्रमुख फलंदाजांच्या अपयशानंतर तिलक वर्माने केलेल्या आक्रमक खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर बंगळुरूविरुद्धच्या लढतीत प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी गमावून १७१ अशी आव्हानात्मक मजल मारत बंगळुरूसमोर १७२ धावाचे लक्ष्य ठेवले. एकवेळ धावांची शंभरी तरी पार करणार का, असे चित्र असताना तिलक वर्माने केलेली खेळी बंगळुरूसमोर आव्हान निर्माण करणारी ठरली.

मुंबई इंडियन्स तर्फे झुंजार खेळी करणारा तिलक वर्मा

बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसी याने नाणेफेक जिंकत मुंबईला पहिल्यांदा फलंदाजी दिली. मुंबईच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर ईशान किशनने सुरुवात धडाक्‍यात करत २ चौकार फटकावले. मात्र एक अनाठायी फटका खेळून तो १० धावांवर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर एकापाठोपाठ एक प्रमुख फलंदाज बाद होण्याची रांग लागली.

कर्णधार रोहित शर्मा याने साफ निराशा केली. अवघी १ धाव काढून तो तंबूत परतला. कॅमेरून ग्रीनकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र, तोदेखील ५ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव १६ चेंडूत १५ धावांवर माघारी गेला. यावेळी तिलक वर्मा खेळपट्टीवर आला व त्याने संघाचा डाव सावरला. त्याने नेहाल वधेराला साथीला घेत संघाचे अर्धशतक फलकावर लावले.

वधेरा स्थिरावला असे वाटत असतानाच १३ चेंडूत १ चौकार व ३ षटकारांसह २२ धावांवर बाद झाला. टीम डेव्हीड व हृतिक शोकीनही अपयशी ठरले. समोरून एकेक फलंदाज बाद होत असताना तिलक वर्माने अर्धशतक पूर्ण केले. तसेच संघाचा डाव एकहाती सावरताना संघाला दीडशतकी धावसंख्येच्या पुढे मजल मारून दिली. त्याने नाबाद ८४ धावांची लक्षणीय खेळी केली. त्यात त्याने ४६ चेंडूत ९ चौकार व ४ षटकारांची आतषबाजी केली.

तळात अर्शद खानने नाबाद १५ धावांची खेळी करत तिलकला साथ दिली. बंगळुरूकडून कर्ण शर्माने सर्वाधिक २ गडी बाद केले. रीस टाॅपले, मायकल ब्रेसवेल, मोहम्मद सिराज, आकाशदीप व हर्षल पटेल यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत पुन्हा एकदा रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने सलामीच्या लढतीत सुमार कामगिरी करायची परंपरा सलग ११ वर्षे कायम राखली. त्याच्यासह प्रमुख ४ फलंदाज सपशेल अपयशी ठरले आणि जोफ्रा आर्चर संघात येऊनही गोलंदाजी संपूर्ण निष्प्रभ अशीच सिद्ध झाली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!