30.5 C
Mālvan
Saturday, April 5, 2025
IMG-20240531-WA0007

पाणी पोहोचले…आंदोलन मागे घेतले ; तिलारी पाटबंधारे विभागाची सर्व स्तरांतून प्रशंसा.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारीचे पाणी बांदा वाफोलीच्या गावाच्या पुढे येईल की नाही हा प्रश्न शेतकऱ्यांना होता. त्यामुळे इन्सुली सह निगुडे, रोणापाल ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. इशाऱ्यानंतर संबंधित विभागाला जाग आल्याने विलवडे येथे सुरू असलेले काम लवकरात लवकर आटोपून पाणी जलदगतीने सोडले. शनिवारी मध्यरात्री इन्सुलीत पाणी दाखल झाल्याने इन्सुली ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. तर सर्वच स्तरातून तिलारी पाटबंधारे विभागाची प्रशंसा होत आहे आणि त्यामुळेच ग्रामपंचायत सदस्या सौ. सोनाली मेस्त्री यांनी दिलेला आंदोलनाचा इशारा मागे घेतला आहे.

गतवर्षी ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर व सहकाऱ्यांनी विविध आंदोलने करून तिलारी विभागाला इन्सुली पर्यंत पाणी आणण्यास प्रशासनाला भाग पाडले होते.तर गतवर्षी इन्सुलीत पाणी आल्याने दरवर्षी होणारी पाणी टंचाई टळली होती. तर यंदाही पाणी येईल की नाही असा प्रश्न सर्वांना होता. अलीकडेच मार्च मध्ये विलवडे येथे साडे चारशे मीटर कालवा उखडून काढुन तो रिपेअर करण्याचे काम सुरू केले होते सदरचे काम पूर्ण होण्यास किमान दोन ते तीन महिन्याची आवश्यकता होती तो पर्यंत उन्हाळा निघून जाणार होता. याबाबतची पाहणी केल्या नंतर इन्सुली ग्रामपंचायत सदस्य सौ सोनाली संतोष मेस्त्री यांनी पाणी येई पर्यत घागर घेऊन कालव्यात बसून बेमुदत मूक आंदोलन करणार असा इशारा दिला होता

त्यानंतर संबंधित विभागाने खडबडून जागे होत वाफोलि येथे सुरू असलेल्या कामाला गती देत कालव्यातुन पाणी पुढे जण्याएवढे काम पूर्ण केले आणि गोव्यात होणारा पाण्याचा विसर्ग कमी करून बांदा कालव्याला पाणी सोडले. शनिवारी मध्यरात्री पाणी इन्सुलीत आल्याने ग्रामपंचायत सदस्या सौ. सोनाली मेस्त्री यांनी पुकारलेले आंदोलन मागे घेतले असून त्यांनी तिलारी विभागाचे इन्सुली गावाच्या वतीने आभार व्यक्त केले आहे तसेच शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर योग्य तेवढाच करून शेती करावी असे आवाहन केले आहे. सदरचे पाणी निगुडे, रोणापाल पर्यंत जाणार असून त्याही भागातील सरपंच, माजी सरपंच यांनी दिलेल्या लढ्याला यश आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!