विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने कणकवली- मालवण बसफेरी सुरु करण्याची मागणी.
चिंदर | विवेक परब : कोरोनाकाळ सुरु झाल्यापासून शाळा व महाविद्यालये बंद होती परंतु आता मात्र सरकारने ती पुन्हा सुरु केली आहेत.
मात्र लाॅकडाऊनमध्ये बंद तथा रद्द करण्यात आलेल्या एसटी बसच्या फेर्या लाॅकडाऊन शिथिल होत शाळा महाविद्यालये सुरु झाल्यावर पूर्ववत होणे अपेक्षित होते.
परंतु अजून तरी तसे न झाल्याने पळसंबचे सरपंच श्री.चंद्रकांत गोलतकर यांनी कणकवली विभागीय कार्यालयातील विभाग नियंत्रकांना लेखी निवेदन दिले. या निवेदनामध्ये कणकवलीहून सकाळी सहा वाजता सुटणारी व आचरामार्गे मालवणला येणारी कणकवली-मालवण बससेवा पूर्ववत सुरु करायची मागणी केलेली आहे.
सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांनी ह्या निवेदनाची एकेक पोच प्रत मान.आमदार वैभव नाईक व आगार व्यवस्थापक कणकवली यांनाही दिली आहे.
शुभैच्छा मा. सौ. पंडीत मॅडम.