27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

गडनदी पुलावर ‘भजनज्योती नमोsस्तुते…. !’

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली गडनदी पुलावर मेणबत्ती प्रज्वलित करत जागवल्या स्मृती..

५३ वर्षांपूर्वी अपघाताने कालवश झालेल्या भजनप्रेमींना कणकवली पंचक्रोशीतील भजनभक्तांनी वहिली श्रद्धांजली..

कणकवली | उमेश परब : विशेष वृत्त : कोकणातील भजनप्रेम आणि उत्साहाची अख्ख्या जगाला भुरळ पडलेली आहे. संतकाळापासून रचले गेलेले अभंग व त्यांच्या रचनांना कोकणातील बुवांनी आणि त्यांना साथ देणार्या वाद्यवृंदाने त्यांच्या कलेने आणि भक्तीने अनेक तल्लीन व्हायला लावणार्या रचना साकारल्या आहेत. तंत्रज्ञान, ध्वनीमुद्रण वगैरे सोयी नसतानाही कोकणातील बुवांच्या रचना पिढ्यानपिढ्या त्याच भक्तीरसात न्हाऊन पुढे कशा सरकल्या असाव्यात याची एक ‘भजन ज्योत प्रचिती कणकवली पंचक्रोशी आणि हळवलवासियांनी सर्वांना करुन दिली आहे. कोकणतील आजच्या धार्मिक, सांस्कृतिक वारसा जपणार्या पिढीला जर पूर्वजांचा आदर व आठवण आहे तर तो कोकणच्या पूर्वजांच्या अदृश्य पण परिणामकारक संस्कारांचा विजय म्हणता येईल.

५३ वर्षांपूर्वी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी कणकवली तेलीआळी येथील भजनप्रेमी ट्रकमधून भजनासाठी चालले होते. परंतु काळ डाव साधल्याने गडनदीपुलाशेजारील हळवल फाटा येथे भजनासाठी जात असलेला हा ट्रक दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात ट्रकमध्ये असलेल्या भजनप्रेमींचा मृत्यू झाला होता. या मृत्यूमुखी पडलेल्यांना आज सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी हळवल गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच मेणबत्ती प्रज्वलित करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
या अपघातात अनेक भजनी कलावंतासह हळवल गावातील प्रसिद्ध असे श्री. धकु राणे बुवा यांचेही निधन झाले होते. प्रतिवर्षी त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली जाते.
यावेळी हळवल सरपंच दिपक गुरव, माजी सभापती मधुकर सावंत, माजी पोलीस पाटील प्रकाश गुरव, ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे, अविनाश राणे, श्री. सावंत, संदेश उर्फ राजू राणे, अमोल राणे, अतुल राणे, सुदर्शन राणे, संदीप राणे, अक्षय सावंत, सुभाष राणे, मंदार राणे, नाथा राणे, सचिन उर्फ आप्पा राणे, सुरज राणे तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

गडनदीवरील ह्या भजनज्योती नमोsस्तुते तत्वामध्ये भजनप्रेमींची सांस्कृतिक ,धार्मिक, अध्यात्मिक आणि सामाजीक तत्वे जपायची कृती इच्छा म्हणजे कोकणची सक्षम व अखंड कृतज्ञतेची संस्कारज्योतच आहे असे म्हणणे इष्ट ठरेल.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली गडनदी पुलावर मेणबत्ती प्रज्वलित करत जागवल्या स्मृती..

५३ वर्षांपूर्वी अपघाताने कालवश झालेल्या भजनप्रेमींना कणकवली पंचक्रोशीतील भजनभक्तांनी वहिली श्रद्धांजली..

कणकवली | उमेश परब : विशेष वृत्त : कोकणातील भजनप्रेम आणि उत्साहाची अख्ख्या जगाला भुरळ पडलेली आहे. संतकाळापासून रचले गेलेले अभंग व त्यांच्या रचनांना कोकणातील बुवांनी आणि त्यांना साथ देणार्या वाद्यवृंदाने त्यांच्या कलेने आणि भक्तीने अनेक तल्लीन व्हायला लावणार्या रचना साकारल्या आहेत. तंत्रज्ञान, ध्वनीमुद्रण वगैरे सोयी नसतानाही कोकणातील बुवांच्या रचना पिढ्यानपिढ्या त्याच भक्तीरसात न्हाऊन पुढे कशा सरकल्या असाव्यात याची एक 'भजन ज्योत प्रचिती कणकवली पंचक्रोशी आणि हळवलवासियांनी सर्वांना करुन दिली आहे. कोकणतील आजच्या धार्मिक, सांस्कृतिक वारसा जपणार्या पिढीला जर पूर्वजांचा आदर व आठवण आहे तर तो कोकणच्या पूर्वजांच्या अदृश्य पण परिणामकारक संस्कारांचा विजय म्हणता येईल.

५३ वर्षांपूर्वी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी कणकवली तेलीआळी येथील भजनप्रेमी ट्रकमधून भजनासाठी चालले होते. परंतु काळ डाव साधल्याने गडनदीपुलाशेजारील हळवल फाटा येथे भजनासाठी जात असलेला हा ट्रक दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात ट्रकमध्ये असलेल्या भजनप्रेमींचा मृत्यू झाला होता. या मृत्यूमुखी पडलेल्यांना आज सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी हळवल गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच मेणबत्ती प्रज्वलित करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.
या अपघातात अनेक भजनी कलावंतासह हळवल गावातील प्रसिद्ध असे श्री. धकु राणे बुवा यांचेही निधन झाले होते. प्रतिवर्षी त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली जाते.
यावेळी हळवल सरपंच दिपक गुरव, माजी सभापती मधुकर सावंत, माजी पोलीस पाटील प्रकाश गुरव, ओसरगाव माजी उपसरपंच बबली राणे, अविनाश राणे, श्री. सावंत, संदेश उर्फ राजू राणे, अमोल राणे, अतुल राणे, सुदर्शन राणे, संदीप राणे, अक्षय सावंत, सुभाष राणे, मंदार राणे, नाथा राणे, सचिन उर्फ आप्पा राणे, सुरज राणे तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

गडनदीवरील ह्या भजनज्योती नमोsस्तुते तत्वामध्ये भजनप्रेमींची सांस्कृतिक ,धार्मिक, अध्यात्मिक आणि सामाजीक तत्वे जपायची कृती इच्छा म्हणजे कोकणची सक्षम व अखंड कृतज्ञतेची संस्कारज्योतच आहे असे म्हणणे इष्ट ठरेल.

error: Content is protected !!