आरोग्य क्षेत्रातील तज्ञ अधिकारी आणि प्रशासकीय अधिपरिचारीका करणार मार्गदर्शन…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींसाठी सुवर्णसंधी…!
कणकवली | उमेश परब : आज आरोग्य सेवेमध्ये रजिस्ट्रेशन असणाऱ्या परिचारिकांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रस्टची मोठी हॉस्पिटल्स व इतर छोट्या हॉस्पिटल्समध्ये नर्सेसची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्यापटीत ट्रेंड नर्सची उपलब्धता कमी असल्याने नर्सिंग पेशाचे महत्व अधोरेखित होत आहे. याचा विचार करुन RANM, GNM तसेच BSc Nursing, PBBSc Nursing अशा विविध अभ्यासक्रम घेवू इच्छिणाऱ्या १२वी पास (आर्टस् ,कॉमर्स, सायन्स, व व्होकेशनल) विद्यार्थीनींसाठी रविवार दि.१० ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०.३० ते १.०० या वेळेत आयडीयल नर्सिंग स्कूल नाईक बिल्डिंग, मुंबई – गोवा हायवे कोर्टा शेजारी कणकवली येथे मोफत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे. हे मार्गदर्शन आरोग्य क्षेत्रातील अधिकारी व प्रशासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिपरिचारिकांद्वारे केले जाणार आहे. तरी इच्छुकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकांवर संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे. 9527558561, 9422381995, 8432547667, 9579197667.