ख़ास वाफोली येथील महिलांसाठी आयोजीत आरोग्य शिबिर.
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘वाफोली ग्रामपंचायत व घे भरारी ग्रामसंघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने लव्ह विशेष वाफोली येथील महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन सोसायटी सभागृह वाफोली येथे करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करून या शिबिराचे उद्घाटक माजी आरोग्य सभापती श्री प्रमोद कामत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.आरोग्य शिबिरा मध्ये महिलांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सी.बी.सी.,थायरॉईड, कॅल्शियम, तसेच रक्तातील काविळीची तपासणी व त्यावरील उपचारासाठी मोफत औषधे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री उमेश शिरोडकर,प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.नेत्रा सावंत स्त्री रोगतज्ञ सावंतवाडी,डॉ.पुष्पलता मणेरीकर/सावळ (प्रा.आरोग्य उपकेंद्र विलवडे ) हे उपस्थित होते. यावेळी शिबिरासाठी येणाऱ्या सर्व महिलांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली होती. डॉ.नेत्रा सावंत यांनी उपस्थित महिलांसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. तब्बल १८० महिलांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी सेविका,ग्रामसेवक श्री प्रसाद ठाकूर, आशासेविका,ग्रामपंचायत कर्मचारी,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी सूत्रसंचालन वाफोली विकास सोसायटी चेअरमन सौ.धनश्री विलास गवस यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसरपंच श्री विनेश गवस यांनी मानले.