24.6 C
Mālvan
Thursday, December 12, 2024
IMG-20240531-WA0007

इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थानच्या रामनवमी उत्सवाला प्रारंभ ; विविध संगीत अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा येथील इनामदार ‘श्री देव रामेश्वर’ संस्थानच्या रामनवमी उत्सवाला आज बुधवारी संस्थानी थाटात सुरुवात झाली आहे.  हा उत्सव हनुमान जयंती पर्यंत चालणार आहे.  बुधवारी दुपारी  ‘जय जय रघुवीर समर्थ ‘ अशा लल़कारी  नंतर वाजत गाजत श्रींच्या मंदिरात श्री रघुपतींच्या मूर्तीचे आगमन झाले. त्यानंतर रयतेसाठी नूतन पंचांगाचे वाचन करण्यात आले. आगमननंतर पट्टाभिषिक्त श्री रघुपतीची मूर्तीची स्थापना झाली. 

श्री रामनवमी उत्सवासाठी रामेश्वर मंदिर व आजुबाजूचा परिसर विद्युत रोषणाई ने सजविला आला आहे. या उत्सवात आपली कला सादर करण्यासाठी कराड, सांगली, सातारा, कोल्हापुर आदी भागातून बँडपथकेही दाखल झाली आहेत.

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या संस्थानी थाटात साजरा होणारा उत्सव म्हणून या रामनवमी उत्सवाकडे पाहिले जाते. दुपारी रघुपतीची आरती झाल्यावर भक्तगणांसाठी प्रसाद वितरीत करण्यात आला. सायंकाळी शाही थाटात ‘श्री ‘ च्या पाषाणाला न्हावन घालण्यात आले. त्यानंतर पुराण वाचन करण्यात आले. नंतर श्री च्या दरबारात हजेरी लावलेल्या कलाकारांनी आपली गायन सेवा सादर केली. तसेच रात्री संस्थानाच्या शाही लवाजम्यासह पारंपारीक थाटात श्री विष्णूची मूर्ती ,शृंगारलेली पालखीत विराजमान होऊन पालखी श्री रामेश्वर मंदिरा भोवती सोमसूञी प्रदक्षिणा करते. त्यानंतर सभाबुवा ह. भ. प. संजय करताळकर (नागपूर) यांचे किर्तन असा दिनक्रम रोज ललिता पंचमी पर्यंत चालणार आहे.

बुधवारी २२ ला दुपारी रघुपती आरती, सायंकाळी  माख़न (पुजा) सायं सभामंडपातील पुराण वाचन रोज रात्री श्रींची पालखी सोहळा होणार आहे. पालखी सोहळ्याला उत्सवाचे किर्तनकार बुवा ह. भ. प. संजय करताळकर (नागपूर) यांचे कीर्तन होणार असून पेटीसाथ श्री. आनंद लिंगायत तबला साथ श्री. अभिषेक भालेकर यांची लाभणार आहे.

शुकवारी २४ मार्चला श्री. सुधांशु सोमण (मिठबांव)यांचे गायन,  शनिवारी २५ मार्चला सायं. ०५:३० वा. गायन कार्यक्रम गायक के अथर्व पिसे यांचे गायन, रविवारी २६ मार्चला  सकाळी १० वाजता  दिलीप ठाकूर यांचे गायन ऑर्गनसाथ श्री. भालचंद्र केसकर यांची असणार आहे.
०५:३० वा. शास्त्रीय गायन कार्यक्रम गायिका सौ. समिक्षा भोबे-काकोडकर गोवा यांचे होणार आहे. सोमवारी २७ मार्चला गायक  श्री. विनय वझे व सहकारी यांचे गायन, मंगळवार दि. २८ मार्च रोजी सकाळी १०:०० वा व सायं. ०५:३० वा. गायन मैफिल गायक श्री. नितिन ढवळीकर यांची होणार असून बुधवार दि. २९ मार्च रोजी सकाळी १०:०० वा,  बुधवार दि. २९ रोजी सायं. ०५:३० गायक  पं. राम मराठे यांचे नातू  गायन श्री. भाग्येश मराठे (ठाणे) यांची सांगित मैफिल होणार असून त्यात तबला साथ  श्री. रामकृष्ण करंबेळकर, श्री. वरद सोहनी यांची राहणार आहे. गुरुवारी ३०  रोजी रामनवमी उत्सव होणार असून रामजन्माचे किर्तन श्री. मिलंदबुवा कुळकर्णी करणार असून सायं. ०५:३० वा. गायिका श्रीम. निराली कार्तिक (पुणे) यांचे गायन होणार आहे. शुक्रवार दि. ३१ मार्च रोजी सकाळी 10 वा. गायिका श्रीम. निराली कार्तिक (पुणे)यांचे गायन, शनिवार दि. ०१ एप्रिल रोजी रात्री ०९:३० वा. विठ्ठल रखुमाई मित्र मंडळ आचरा यांचा कार्यक्रम आचरा आनंदरंग पांडुरंग पांडुरंग हा कार्यक्रम होणार असून कलाकार दौलत राणे, मंदार सांबारी, उदय पुजारे,विजय कदम यांचा सहभाग असणार आहे. बुधवारदि. ०५ रोजी रात्री ११:०० वा. हनुमान जयंती निमित्त श्री. रामेश्वर प्रॉडक्शन, मुंबई यांचे दोन अंकी नाटक ‘गाव तसो चांगलो’  होणार आहे. गुरुवार दि. ०६ एप्रिल रोजी हनुमान जयंती, पहाटे पालखी नंतर श्री हनुमान जन्माचे किर्तन बुवा श्री. मिलिंद बुवा कुळकर्णी करणार आहेत. या रामनवमी उत्सवात सहभागी होऊन भाविकांनी कार्यकामांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानाचे अध्यक्ष मिलिंद प्रभूमिराशी व सचिव अशोक पाडावे यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

विवेक परब | ब्युरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आचरा येथील इनामदार 'श्री देव रामेश्वर' संस्थानच्या रामनवमी उत्सवाला आज बुधवारी संस्थानी थाटात सुरुवात झाली आहे.  हा उत्सव हनुमान जयंती पर्यंत चालणार आहे.  बुधवारी दुपारी  'जय जय रघुवीर समर्थ ' अशा लल़कारी  नंतर वाजत गाजत श्रींच्या मंदिरात श्री रघुपतींच्या मूर्तीचे आगमन झाले. त्यानंतर रयतेसाठी नूतन पंचांगाचे वाचन करण्यात आले. आगमननंतर पट्टाभिषिक्त श्री रघुपतीची मूर्तीची स्थापना झाली. 

श्री रामनवमी उत्सवासाठी रामेश्वर मंदिर व आजुबाजूचा परिसर विद्युत रोषणाई ने सजविला आला आहे. या उत्सवात आपली कला सादर करण्यासाठी कराड, सांगली, सातारा, कोल्हापुर आदी भागातून बँडपथकेही दाखल झाली आहेत.

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या संस्थानी थाटात साजरा होणारा उत्सव म्हणून या रामनवमी उत्सवाकडे पाहिले जाते. दुपारी रघुपतीची आरती झाल्यावर भक्तगणांसाठी प्रसाद वितरीत करण्यात आला. सायंकाळी शाही थाटात 'श्री ' च्या पाषाणाला न्हावन घालण्यात आले. त्यानंतर पुराण वाचन करण्यात आले. नंतर श्री च्या दरबारात हजेरी लावलेल्या कलाकारांनी आपली गायन सेवा सादर केली. तसेच रात्री संस्थानाच्या शाही लवाजम्यासह पारंपारीक थाटात श्री विष्णूची मूर्ती ,शृंगारलेली पालखीत विराजमान होऊन पालखी श्री रामेश्वर मंदिरा भोवती सोमसूञी प्रदक्षिणा करते. त्यानंतर सभाबुवा ह. भ. प. संजय करताळकर (नागपूर) यांचे किर्तन असा दिनक्रम रोज ललिता पंचमी पर्यंत चालणार आहे.

बुधवारी २२ ला दुपारी रघुपती आरती, सायंकाळी  माख़न (पुजा) सायं सभामंडपातील पुराण वाचन रोज रात्री श्रींची पालखी सोहळा होणार आहे. पालखी सोहळ्याला उत्सवाचे किर्तनकार बुवा ह. भ. प. संजय करताळकर (नागपूर) यांचे कीर्तन होणार असून पेटीसाथ श्री. आनंद लिंगायत तबला साथ श्री. अभिषेक भालेकर यांची लाभणार आहे.

शुकवारी २४ मार्चला श्री. सुधांशु सोमण (मिठबांव)यांचे गायन,  शनिवारी २५ मार्चला सायं. ०५:३० वा. गायन कार्यक्रम गायक के अथर्व पिसे यांचे गायन, रविवारी २६ मार्चला  सकाळी १० वाजता  दिलीप ठाकूर यांचे गायन ऑर्गनसाथ श्री. भालचंद्र केसकर यांची असणार आहे.
०५:३० वा. शास्त्रीय गायन कार्यक्रम गायिका सौ. समिक्षा भोबे-काकोडकर गोवा यांचे होणार आहे. सोमवारी २७ मार्चला गायक  श्री. विनय वझे व सहकारी यांचे गायन, मंगळवार दि. २८ मार्च रोजी सकाळी १०:०० वा व सायं. ०५:३० वा. गायन मैफिल गायक श्री. नितिन ढवळीकर यांची होणार असून बुधवार दि. २९ मार्च रोजी सकाळी १०:०० वा,  बुधवार दि. २९ रोजी सायं. ०५:३० गायक  पं. राम मराठे यांचे नातू  गायन श्री. भाग्येश मराठे (ठाणे) यांची सांगित मैफिल होणार असून त्यात तबला साथ  श्री. रामकृष्ण करंबेळकर, श्री. वरद सोहनी यांची राहणार आहे. गुरुवारी ३०  रोजी रामनवमी उत्सव होणार असून रामजन्माचे किर्तन श्री. मिलंदबुवा कुळकर्णी करणार असून सायं. ०५:३० वा. गायिका श्रीम. निराली कार्तिक (पुणे) यांचे गायन होणार आहे. शुक्रवार दि. ३१ मार्च रोजी सकाळी 10 वा. गायिका श्रीम. निराली कार्तिक (पुणे)यांचे गायन, शनिवार दि. ०१ एप्रिल रोजी रात्री ०९:३० वा. विठ्ठल रखुमाई मित्र मंडळ आचरा यांचा कार्यक्रम आचरा आनंदरंग पांडुरंग पांडुरंग हा कार्यक्रम होणार असून कलाकार दौलत राणे, मंदार सांबारी, उदय पुजारे,विजय कदम यांचा सहभाग असणार आहे. बुधवारदि. ०५ रोजी रात्री ११:०० वा. हनुमान जयंती निमित्त श्री. रामेश्वर प्रॉडक्शन, मुंबई यांचे दोन अंकी नाटक 'गाव तसो चांगलो'  होणार आहे. गुरुवार दि. ०६ एप्रिल रोजी हनुमान जयंती, पहाटे पालखी नंतर श्री हनुमान जन्माचे किर्तन बुवा श्री. मिलिंद बुवा कुळकर्णी करणार आहेत. या रामनवमी उत्सवात सहभागी होऊन भाविकांनी कार्यकामांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थानाचे अध्यक्ष मिलिंद प्रभूमिराशी व सचिव अशोक पाडावे यांनी केले आहे.

error: Content is protected !!