24.6 C
Mālvan
Saturday, November 23, 2024
IMG-20240531-WA0007

भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला दिल्लीसह उत्तर भारत ; भूकंपाचे केंद्र तुर्कमेनिस्तान..!

- Advertisement -
- Advertisement -

नवी दिल्ली | ब्यूरो न्यूज : काल रात्रीपासून नवी दिल्ली सह एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ७.७ इतकी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाचे केंद्र तुर्कमेनिस्तन येथे असून भारत, कझाकिस्तान, पाकिस्तान, तजाकिस्तान, उझबेकिस्तान, चीन, अफगाणिस्तान आणि किर्गिस्तानमध्येही हे हादरे जाणवले आहेत.

‘सीस्मोलॉजी’ विभागाच्या माहितीनुसार रात्री १० वाजून १७ मिनिटांनी अफगाणिस्तानपासून ९० किमी अंतरावर भूकंपाचे धक्के आधी जाणवले नंतर भारतात दिल्ली आणि एनसीआर परिसरात भूकंपाचे हादरे बसले. धक्के इतके तीव्र होते की काही सेकंद याचे हादरे जाणवत होते. यामुळे परिसरात घबराट पसरलेली पाहायला मिळाली. नागरिक खुल्या मैदानात बाहेर पडले होते.

उत्तर भारतात आणखीन २६ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सूत्रांकडून समजते आहे. दरम्यान दिल्लीतील काही जुन्या इमारतींना क्षती पोचल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

नवी दिल्ली | ब्यूरो न्यूज : काल रात्रीपासून नवी दिल्ली सह एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ७.७ इतकी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाचे केंद्र तुर्कमेनिस्तन येथे असून भारत, कझाकिस्तान, पाकिस्तान, तजाकिस्तान, उझबेकिस्तान, चीन, अफगाणिस्तान आणि किर्गिस्तानमध्येही हे हादरे जाणवले आहेत.

'सीस्मोलॉजी' विभागाच्या माहितीनुसार रात्री १० वाजून १७ मिनिटांनी अफगाणिस्तानपासून ९० किमी अंतरावर भूकंपाचे धक्के आधी जाणवले नंतर भारतात दिल्ली आणि एनसीआर परिसरात भूकंपाचे हादरे बसले. धक्के इतके तीव्र होते की काही सेकंद याचे हादरे जाणवत होते. यामुळे परिसरात घबराट पसरलेली पाहायला मिळाली. नागरिक खुल्या मैदानात बाहेर पडले होते.

उत्तर भारतात आणखीन २६ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सूत्रांकडून समजते आहे. दरम्यान दिल्लीतील काही जुन्या इमारतींना क्षती पोचल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

error: Content is protected !!