27.2 C
Mālvan
Friday, April 11, 2025
IMG-20240531-WA0007

पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण यांनी माध्यमिक विद्यामंदिर साळशीत ‘मातृ पितृ देवो भव:’ चा दिला संदेश.

- Advertisement -
- Advertisement -

आई-वडिलांना वृद्धाश्रमात जायची वेळ येईल असे वागणे टाळायचे केले विशेष मार्गदर्शन.

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडचे पोलीस उपनिरीक्षक तथा नाट्यलेखक, दिग्दर्शक दशरथ चव्हाण यांनी साळशी हायस्कूल येथे ‘मातृ पितृ देवो भव:’ चा विशेष संदेश दिला. आपले आचार विचार स्वच्छ ठेवा. नेहमी चांगले कर्म करा. कारण आपले कर्मच शेवटपर्यंत आपल्या सोबत रहाते. आपले आईवडील हेच आपले विठठल रखुमाई आहेत. त्यांचे सेवा करा. त्यांना कधीच कमी लेखू नका. तुम्ही कितीही मोठे झालात तरी आपल्या आईवडिलांना चुकूनही वृद्धाश्रमात पाठवू नका. त्यांच्या भावना जपा.त्यांना सन्मानाने वागवा. असे प्रतिपादन देवगड पोलीस उपनिरीक्षक तथा नाट्यलेखक, दिग्दर्शक दशरथ चव्हाण यांनी साळशी हायस्कूल येथे बोलताना व्यक्त केले.

माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे शनि. दि. ११ मार्च ला ” मुलांचा मोबाईल वापर व आईवडिलांशी सुसंवाद, प्रेम व भविष्यात आपण कोण बनणार?” या विषयावर मुलांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री चव्हाण बोलत होते. ते पुढे म्हणाले की, प्रेम करताना ते निस्सीम असावे. चांगल्या भावना मनात ठेवा. मन प्रसन्न ठेवा. एकमेकांविषयी आदरभाव ठेवा. मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करा. त्याचा दुरुपयोग करू नका. आय एस, आय पी एस. होण्यासाठी मुलांनी जरूर प्रयत्न करा. या परीक्षा देण्यासाठी जी जी पुस्तके लागतील ती मी स्वतःच्या खर्चाने देण्यास तयार आहे. जी कुणी मुले या परीक्षेसाठी इच्छुक असतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असेही यावेळी देवगड पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण यांनी बोलताना सांगितले.

यावेळी संस्था चेअरमन सत्यवान सावंत, चाफेडचे माजी सरपंच सत्यवान भोगले, मुख्याध्यापक माणिक वंजारे, संस्था सदस्य संतोष आत्माराम साळसकर, संतोष दत्ताराम साळसकर, शिक्षक संजय मराठे, पुरुषोत्तम साटम, स्वप्नील भरणकर, साळशी पोस्टमन स्वप्नील तेली आदींसह शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार पुरुषोत्तम साटम यांनी मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आई-वडिलांना वृद्धाश्रमात जायची वेळ येईल असे वागणे टाळायचे केले विशेष मार्गदर्शन.

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडचे पोलीस उपनिरीक्षक तथा नाट्यलेखक, दिग्दर्शक दशरथ चव्हाण यांनी साळशी हायस्कूल येथे 'मातृ पितृ देवो भव:' चा विशेष संदेश दिला. आपले आचार विचार स्वच्छ ठेवा. नेहमी चांगले कर्म करा. कारण आपले कर्मच शेवटपर्यंत आपल्या सोबत रहाते. आपले आईवडील हेच आपले विठठल रखुमाई आहेत. त्यांचे सेवा करा. त्यांना कधीच कमी लेखू नका. तुम्ही कितीही मोठे झालात तरी आपल्या आईवडिलांना चुकूनही वृद्धाश्रमात पाठवू नका. त्यांच्या भावना जपा.त्यांना सन्मानाने वागवा. असे प्रतिपादन देवगड पोलीस उपनिरीक्षक तथा नाट्यलेखक, दिग्दर्शक दशरथ चव्हाण यांनी साळशी हायस्कूल येथे बोलताना व्यक्त केले.

माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे शनि. दि. ११ मार्च ला " मुलांचा मोबाईल वापर व आईवडिलांशी सुसंवाद, प्रेम व भविष्यात आपण कोण बनणार?" या विषयावर मुलांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री चव्हाण बोलत होते. ते पुढे म्हणाले की, प्रेम करताना ते निस्सीम असावे. चांगल्या भावना मनात ठेवा. मन प्रसन्न ठेवा. एकमेकांविषयी आदरभाव ठेवा. मोबाईलचा वापर चांगल्या कामासाठी करा. त्याचा दुरुपयोग करू नका. आय एस, आय पी एस. होण्यासाठी मुलांनी जरूर प्रयत्न करा. या परीक्षा देण्यासाठी जी जी पुस्तके लागतील ती मी स्वतःच्या खर्चाने देण्यास तयार आहे. जी कुणी मुले या परीक्षेसाठी इच्छुक असतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असेही यावेळी देवगड पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण यांनी बोलताना सांगितले.

यावेळी संस्था चेअरमन सत्यवान सावंत, चाफेडचे माजी सरपंच सत्यवान भोगले, मुख्याध्यापक माणिक वंजारे, संस्था सदस्य संतोष आत्माराम साळसकर, संतोष दत्ताराम साळसकर, शिक्षक संजय मराठे, पुरुषोत्तम साटम, स्वप्नील भरणकर, साळशी पोस्टमन स्वप्नील तेली आदींसह शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार पुरुषोत्तम साटम यांनी मानले.

error: Content is protected !!