सहसंपादक /वैशाली पंडित : सावंतवाडी पर्यावरण रक्षण आणि संगोपन ही काळाची तातडीची आणि प्रथम क्रमांकाची गरज ओळखून सावंतवाडीतल्या ‘कबीर हेरेकर’ या बालकाने सगळ्यांना तळमळीचे आवाहन केले आहे. आपल्या आवाहनात तो म्हणतो की,’ या वर्षी आपण खाल्लेल्या आंबे , फणसाच्या बियांचा योग्य वापर करूया.आपण जमा केलेल्या बिया मला आणून द्या किंवा 7387606444 या क्रमांकावर फोन करा.मी स्वतः येऊन त्या बिया गोळा करीन.त्यांची रोपे तयार करून त्या रोपांची पावसाळा सुरू होताच जंगलात लागवड करीन.ही रोपे भविष्यात वृक्षाचे रूप घेतील आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत करतील. निसर्गाची जपणूक करण्यासाठी आपण सहकार्याने आणि एकजुटीने मनापासून प्रयत्न करू कारण पर्यावरणाचे रक्षण संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे याचे भान आपण ठेवूया.’ कबीरचा पूर्ण पत्ता असा-हेरेकर क्लासेस , सावंतवाडी कळसुलकर इंग्लीश शाळेच्या मागे,निंबाळकर पीराजवळ सालईवाडा, सावंतवाडी फोन – 7387606444.
आधुनिक कबीराची आर्त साद !
47
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -