बांदा /राकेश परब : बांदा येथे दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेला रोणापाल येथील सुरज गोठस्कर या शालेय विद्यार्थ्याला रोणापाल वासियांनी आर्थिक मदतीचा हात दिला. सुरजच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सागरची घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने रोणापाल गावातील ग्रामस्थ व तरुण वर्गाने पुढाकार घेत उपचारासाठी आर्थिक मदत दिली. रोणापाल वासियांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रोणापाल येथील सूरज गोठस्कर या शालेय विद्यार्थ्याचा आठ दिवसांपूर्वी बांदा येथे दुचाकीवरुन अपघात झाला होता. यात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या पायावर तातडीने शस्त्रक्रिया होणे गरजेचे होते. मात्र, गोठस्कर कुटुंबियांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने गावातील ग्रामस्थांनी हॉस्पिटलचा अर्धा खर्च करण्याचा निर्धार केला.
रोणापाल माजी सरपंच प्रकाश गावडे यांच्यासोबत ग्रामस्थांनी सावंतवाडी येथे हॉस्पिटलमध्ये सूरजची भेट घेतली. हॉस्पिटलचा अर्धा खर्च देण्याच्या आश्वासना प्रमाणे प्रकाश गावडे आणि अन्य ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ही मदत सुपूर्द करण्यात आली.
यासाठी प्रकाश गावडे, परशुराम गावडे, सुदिन गावडे, राजन परब, नंदकिशोर नेमन, किरण नाईक, एकनाथ भोगटे, सीताराम गावडे, मंगेश गावडे, नरेंद्र कानडे, बाबल तूयेकर, अंकुश काका, दिपक परब, नारायण नाईक, तानाजी धरणे, वामन गावडे, नाना कुडव, प्रशांत प्रमोद गावडे, नवलु कोळापटे, निलेश नाईक, संतोष कोळापटे, सुशांत गावडे, विष्णू तोरस्कर, राजाराम भोगटे, सचिन कुबल यांनी सहकार्य केले. गोठस्कर कुटुंबियांकडून सर्वांचे आभार मानण्यात आले.