कुडाळ | प्रतिनीधी : कुडाळ तालुक्यातील पांग्रड, निरूखे,कडावल या गावात आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आज शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. यावेळी गावागावात शिवसेना संघटना वाढीसंदर्भात शिवसैनिकांना आ. वैभव नाईक यांनी मार्गदर्शन केले. राज्य सरकारच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांची माहिती देत ती विकास कामे लोकांपर्यत पोहोचविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी निरूखे येथे शिवसेनेच्या वतीने कोरोना योद्धयांचा सत्कार करण्यात आला.
पांग्रड येथे जि.प गटनेते नागेंद्र परब, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोभाटे, उपसभापती जयभारत पालव, अतुल बंगे, मंगेश मर्गज, आनंद मर्गज, रामदास मेस्त्री, संजय कदम, दाजी मर्गज, सुरेश मर्गज, विजय मर्गज, नामदेव सावंत, पपू डोंगरे, दत्ताराम मर्गज, औदुंबर मर्गज, सदानंद तावडे
निरूखे येथे सरपंच मंजिरी करंदीकर, उपसरपंच तुकाराम निरूखेकर, स्मिता तेरसे, अक्षता नाईक, अनिरुद्ध करंदीकर, अनिल तांबे, रामदास करंदीकर, सुहास तेरसे, भगवान कदम तर कडावल येथे पंचायत समिती सदस्या शीतल कल्याणकर, दिलीप सावंत, रवींद्र सावंत, जनार्दन पालव, गुरुनाथ मुंज, अमित कल्याणकर, सुभाष मोरजकर, उदय कोदे आदींसह इतर शिवसैनिक उपस्थित होते.